खडसेंच्या नव्या प्लॅनमुळे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार, ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता

जळगाव बी एच आर पतसंस्थेवर खडसेंच्या तक्रारीमुळे कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

खडसेंच्या नव्या प्लॅनमुळे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार, 'या' प्रकरणात कारवाईची शक्यता
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 4:02 PM

जळगाव : राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्याकडून भाजपला हादरे सुरुच आहेत. आताही जळगाव बी एच आर पतसंस्थेवर खडसेंच्या तक्रारीमुळे कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बी एच आर पतसंस्थेमध्ये भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरही (Girish Mahajan) कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळात एकच रर्चा रंगली आहे. (Eknath khadse complain against BHR Credit unions will action be taken against Girish Mahajan too)

या तक्रारीमुळे एकनाथ खडसेंनकडून गिरीश महाजन यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरंतर, 2017 पासून खडसेंनी दिल्लीकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र, भाजपामध्ये फडणवीस आणि खडसे राजकीय वैर असल्यामुळे तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता भाजपला रामराम ठोकताच खडसेंनी पुन्हा एकदा तक्रार करत गिरीश महाजन यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे आता महाविकास आघाडीत असल्याने त्यांनी केलेल्या अनेक तक्रारींची दखल घेतली जात आहे. खडसेंच्या पाठपुराव्यामुळे पतसंस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर चौकशीत आर्थिक गुन्हे शाखेला गिरीश महाजन यांचे एखादे पत्रही सापडलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावर आज 4 वाजता एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे.

खरंतर, फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनपूर्वक रसद पुरवून गिरीश महाजन यांना जिल्ह्यात मोठे गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन अशी दोन शक्तीकेंद्रे उभी झाली होती. आता एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. यामुळे आता पुढे दोन्ही पक्षांत या दिग्गज नेत्यांमुळे कोणता वादंग उभा राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

इतर बातम्या –

महाविकासआघाडीचे सरकार म्हणजे तीन तिघाडा, काम बिघाडा, गिरीश महाजनांचं टीकास्त्र

खडसे साहेब, माझ्या मतदारसंघात लक्ष घालण्यापेक्षा तुम्ही का हरला ते बघा, महाजनांचा पहिला वार

(Eknath khadse complain against BHR Credit unions will action be taken against Girish Mahajan too)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.