AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं’, खडसेंचा पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचाही एकतर्फी विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आनंद व्यक्त केलाय. तसंच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खडसे यांनी जोरदार टीका केलीय

'नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं', खडसेंचा पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा
देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 5:11 PM
Share

मुंबई : जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय पाहायला मिळाला. 21 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 7 जागांवर शिवसेना, 2 जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झालाय. तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचाही एकतर्फी विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आनंद व्यक्त केलाय. तसंच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खडसे यांनी जोरदार टीका केलीय. (Eknath Khadse criticizes Devendra Fadnavis and Girish Mahajan)

देवेंद्र फडणवीस आणि महाजनांवर हल्लाबोल

’40 वर्षे मी भाजप रुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र 40 वर्षे माझी अवहेलनाच केली गेली. पुढच्या कालखंडात नगरपालिका आणि जिल्हा परिषद आमच्या ताब्यात येईल. इतक्या वर्षात गिरीश महाजन हे त्यांच्या मतदारसंघात जाऊ शकले नाहीत. नेते होऊ शकले नाहीत. इतकी वर्षे संघर्ष, आंदोलन, भाषणं मी करत होतो. नाथाभाऊंना कुणीतरी स्पर्धक म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं जातंय. आतापर्यंत महाजनांना मीच मदत करत आलो. सरपंच होते तेव्हा पक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदतही मीच करत आलो. पक्षात नाथाभाऊ मोठे होत आहेत. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून काही नेत्यांनी महाजनांना मोठं केलं’, अशा शब्दात खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

‘जळगाव जिल्ह्यातील नाथाभाऊची ताकद दाखवून दिली’

गेल्या 6 वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक क वर्गात होती. आती ती अ वर्गात आली आहे. बँकेचा संचित तोटा आम्ही कमी केला. शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याचा प्रयत्न केला. त्याचे फलित या निवडणुकीचा निकाल आहे. गिरीश महाजन यांना निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पळ काढला. अपयश येणार याची जाणीव त्यांना झाली होती. या निवडणुकीने जळगाव जिल्ह्यात नाथाभाऊची ताकद किती आहे हे दाखवून दिल्याचं खडसे यांनी आवर्जुन सांगितलं.

रोहिणी खडसे विजयी

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अॅड. रोहिणी खडसेंचा विजय झाला आहे. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी खडसे यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. हा विजय म्हणजे गेल्या 6 वर्षांत केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी व्यक्त केली आहे. यापुढंही जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

‘दंगलीत आरोपी असलेल्या अनिल बोंडेंनी शहाणपणा करु नये’, अशोक चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर

‘सरकारकडून स्पष्ट भूमिका येत नाही तोवर ‘लालपरी’चं चाक फिरणार नाही’, परब-पवारांच्या बैठकीनंतरही पडळकर ठाम

Eknath Khadse criticizes Devendra Fadnavis and Girish Mahajan

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.