Video। एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी, रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

खरं हिंदुत्व कुणाचं यावरून राजकीय पक्षांचे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच रामदेव बाबा यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलंय.

Video। एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी, रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 2:32 PM

मुंबईः शिवसेनेचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे, अशी टीका होत असतानाच योग गुरु रामदेव बाबांच्या एका वक्तव्यानं राजकारणात नवीच चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे हिंदु धर्माचे गौरव पुरूष आहेत. तेच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत, असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलंय. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. त्यातच आता रामदेव बाबांच्या या वक्तव्याने एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी रामदेव बाबांनी भेट घेतली. या भेटीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

काय म्हणाले रामदेव बाबा?

मुख्यमंत्री आमच्या हिंदु धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष आहेत. राजधर्मसोबतच ते सनातन, ऋषीधर्मालाही प्रामाणिकपणे निभावत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आमची आत्मीयता आहे. त्यांचे मानस, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत, असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलंय.

हिंदुत्वाच्या वादात रामदेव बाबांची एंट्री

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेचं हिंदुत्व कधीच संपलंय, अशी टीका भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात येते. तर हिंदुत्वाच्या नावाखाली सत्तेच्या लालसेपोटी एकनाथ शिंदेंनी खेळी केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येतो. भाजपने आधीपासूनच हिंदुत्वाच्या मुद्द्याचा अजेंडा लावून धरलाय. मात्र एकनाथ शिंदे यांची भेट घेत रामदेव बाबांनी त्यांना हिंदु धर्माचे गौरव पुरुष म्हणल्याने नव्याच चर्चांना उधाण आलंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.