Eknath Shinde : महाराष्ट्रात आज दुपारचा शपथविधी? एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार, भाजपसोबत सत्तास्थापन करणार

राज्यातील 35 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन बंडखोरी करणारे मंत्री एकनाथ शिंदेंनी जर आज मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर महाराष्ट्रात खरोखरच मोठा राजकीय भूकंप होणार. ज्या क्षणी एकनाथ शिंदे मंत्री पदाचा राजीनामा देखील त्याचवेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात येईल. काल रात्री उशीर शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांसोबत महत्वाची बैठक घेतलीये.

Eknath Shinde : महाराष्ट्रात आज दुपारचा शपथविधी? एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार, भाजपसोबत सत्तास्थापन करणार
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 10:03 AM

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. सतत नवनवीन घडामोडी घडताना दिसतायंत. काल रात्री एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा खुलासा करत महाविकास आघाडीला जोर का झटका दिला. एकनाथ शिंदे आज मुंबईमध्ये (Mumbai) येण्याची शक्यता आहे, इतकेच नाही तर आज दुपारीच शपथविधी होण्याची शक्यता देखील राजकिय वर्तुळामध्ये वर्तवली जातेयं. यामुळे संपूर्ण देशाचेच लक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे. शिंदे हे भाजपासोबतच सत्तास्थापन करणार हे स्पष्ट आहे. भाजपचे (BJP) मुंबईतील अनेक नेते सध्या एकनाथ शिंदेसोबतच असल्याचे काल दिसून आले. बच्चू कडू देखील एकनाथ शिंदेंच्या खैम्यात आहेत.

एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

राज्यातील 35 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन बंडखोरी करणारे मंत्री एकनाथ शिंदेंनी जर आज मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर महाराष्ट्रात खरोखरच मोठा राजकीय भूकंप होणार. ज्याक्षणी एकनाथ शिंदे मंत्री पदाचा राजीनामा देखील त्याचवेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात येईल. काल रात्री उशीर शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांसोबत महत्वाची बैठक घेतलीये. आज दिल्लीमध्ये राज्यातील कांग्रेस आमदरांची बैठक देखील होणार आहे. दोन तृतीआंश आमदार जवळपास एकनाथ शिंदेंकडे आहेत, यामुळे सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे दिसते आहे.

हे सुद्धा वाचा

आज दुपारी होणार शपथविधी ?

एकनाथ शिंदे साधारण दुपारपर्यंत मुंबईत येतील आणि शपथविधी उरकून घेतील, असे सांगितले जात आहे. काल स्वत: शिंदेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्याकडे 40 आमदार आहेत. यामुळेच महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलयं. मात्र, राज्यपाल कोश्यारींना कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ शिंदेकडे प्रशासकीय पर्याय उपलब्ध असणार आहेत. खरी शिवसेना ही आपल्यासोबत आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फोनवर संवाद झाला, मात्र, तोडगा अद्यापही निघू शकला नाहीये.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.