‘खोट्या केसेस केल्या, पण त्याआधीच मी टांगा पलटी केला’, एकनाथ शिंदे यांचं विधानसभेत मोठं वक्तव्य

"आपल्याच राज्यातीलचं नाही तर जगभरातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या घराच्या खाली जिलेटीनच्या काड्या ठेवल्या जातात. मुंबई असुरक्षित असल्यासारखं त्यांना वाटू लागतं. तुम्ही कायदा-व्यवस्थेवर आमच्यावर काय बोलणार?", असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

'खोट्या केसेस केल्या, पण त्याआधीच मी टांगा पलटी केला', एकनाथ शिंदे यांचं विधानसभेत मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 5:47 PM

मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाचं कामकाज आज संपणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर चौफेर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन मंत्र्यांवर कारवाई झाली आणि त्यांना जेलमध्ये जावं लागलं. त्यावरही त्यांनी भाष्य करत विरोधकांवर टीका केली. “महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात दोन मंत्री जेलमध्ये गेले. यापेक्षा दुर्देवं काय असू शकतं? आपल्याच राज्यातीलचं नाही तर जगभरातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या घराच्या खाली जिलेटीनच्या काड्या ठेवल्या जातात. मुंबई असुरक्षित असल्यासारखं त्यांना वाटू लागतं. तुम्ही कायदा-व्यवस्थेवर आमच्यावर काय बोलणार?”, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

“तुमच्या काळामध्ये गृहविभागात जो बाजार मांडला होता याची कल्पना मी स्वत: तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिली होती. गृहमंत्री जेलमध्ये गेले. आणखी काय पाहिजे? तोडाफोडीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे. कोण-कोणाला फोडले? खोट्या केसेस टाकल्या. मात्र ती वेळ येऊ दिली नाही. त्याच्या आधीच मी टांगा पलटी केला”, असा गोप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.

‘अजित पवार यांची डोळा मारण्याची नवी स्टाईल पाहिली’

“अधिवेशनाच्या निमित्ताने आपण अजित पवारांची नवी डोळा मारण्याची स्टाईल पाहिली. आता त्यांनी कुणाला डोळा मारला, मी त्यांना खाजगीत विचारलं की तुम्ही कुणाला डोळा मारला? ते म्हणाले, जाऊद्याना एकनाथ राव. आपण समजून घेऊया. त्यांनी कुणाला डोळा मारला ते सगळ्यांना माहिती आहे. कोण आलं आणि कुणाला डोळा मारला हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही”, अशी शाब्दिक फटेकबाजी एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

हे सुद्धा वाचा

अमित शाह यांना मोगॅम्बो

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध बोलायची कुणाची लायकी नाही. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात टीका करतात. अमित शाह यांना मोगॅम्बो म्हणतात. मला वाटतं कोणता सिनेमा होता, मिस्टर इंडीया. त्यामध्ये मोगॅम्बो व्हिलन होता. अमित शाह यांनी काश्मीरमध्ये कलम 370 हटवलं. त्यांना तुम्ही व्हिलन ठरवता? यापेक्षा काय दुर्देवं असू शकतो. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी आज अमित शाह यांना मोगॅम्बो नाही तर मिस्टर इंडिया म्हटलं असतं. त्यांचा सन्मान केला असता. पण बाळासाहेब आणि जाऊद्या… त्याला मोठं मन लागतं. त्याला कद्रुपणा चालत नाही. हा संसदीय शब्द आहे ना?”, असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी केला. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

“मला सांगतात की, पूर्णवेळ फिरायला की पडतो. मुख्यमंत्री दिल्लीवारी करतात. अरे मी माणसातला आहे, लोकांमधला आहे म्हणून लोकांमध्ये जातो. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार आहे. माझ्या डोक्यामध्ये हवा गेलेली नाही. माझे पाय अजूनही जमिनीवरतीच आहे. श्रीमंतांच्या यादीत माझं नाव येणार नाही, पण माणुसकीच्या यादीत माझं नाव येईल. या राज्याच्या हितासाठी दिल्लीला जावं लागतं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मंत्र्यांना, पंतप्रधानांना भेटावं लागतं. आम्ही जातो त्यामुळे हजारो कोटी रुपये कोटी रुपये या राज्याच्या विकासासाठी आम्हाला मिळाले आहेत. तुमच्यासारखं आम्ही कडक शिंग झालो असतो तर एक रुपया मिळाला नसता. किती पैसे मिळाले त्यावर मी जाऊ इच्छित नाही. पण विरोधकांची काय परिस्थिती झालीय ते आपण पाहतोय. दिल्लीला जाणं वाईट नाही. आम्ही अनेकवेळा दिल्लीला जाईल. आरोपांना उत्तर हा एकनाथ शिंदे कामांमधून देणार”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.