Eknath Shinde : बंडखोरांनी फोन त्यागले, मग शिंदे स्वतः प्रत्येकाच्या खोलीत गेले! कशासाठी? केसरकरांनी सांगितलं

दीपक केसकरांनी बंडखोरांनी कसे फोन त्यागले आणि मग शिंदे स्वतः प्रत्येकाच्या खोलीत गेले याविषयी सुद्धा सांगितलं. आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आमचे सगळ्यांचे फोन तुमच्याकडे ठेवा. आम्ही फोन दिले. आम्ही फोन दिले. ज्या पिशवीत सगळ्यांचे फोन ठेवले होते, ते फोन...

Eknath Shinde : बंडखोरांनी फोन त्यागले, मग शिंदे स्वतः प्रत्येकाच्या खोलीत गेले! कशासाठी? केसरकरांनी सांगितलं
दीपक केसरकर Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 8:38 AM

मुंबई: विधानसभा उपाध्यक्षांकडून 16 बंडखोरांना निलंबनाची नोटीस आलीये. याविरोधात एकनाथ शिंदे गट (Shinde Group) कोर्टाचं दार ठोठावणार आहे. यासंदर्भात TV9 मराठीशी बोलताना दीपक केसरकरांनी (Deepak Keskar)बंडखोरांनी कसे फोन त्यागले आणि मग शिंदे स्वतः प्रत्येकाच्या खोलीत गेले याविषयी सुद्धा सांगितलं. आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आमचे सगळ्यांचे फोन तुमच्याकडे ठेवा. आम्ही फोन दिले. ज्या पिशवीत सगळ्यांचे फोन ठेवले होते, ते फोन एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) प्रत्येकाच्या खोलीत जााऊन दिले. “माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही कुणाशीही बोला” असंही शिंदे यावेळी आमदारांना म्हणाले.

 एकनाथ शिंदे गट कोर्टाचं दार ठोठावणार

राजीनामा कुणी मागितलाच नाही

काल शिंदे गटाची पत्रकार परिषद झाली. त्यात बोलताना केसरकर म्हणाले, आम्ही शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. ज्या राष्ट्रवादीने आमचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या आमदारांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या खासदारांनाही त्रास दिला गेला. अशास्थितीत शिवसेनेचं अस्तित्व टिकावं यासाठी हा निर्णय घेतलाय. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे. पण विषय दुसराच निघतो. आम्ही विनंती काय केली की शिवसेना-भाजपनं एकत्र यावं, ते काय म्हणतात की मी राजीनामा देतो. पण राजीनामा कुणी मागितलाच नाही. लोकांना भावनिक करण्याचं काम सुरु आहे, असं होऊ नये. शेवटी ते नेते आहेत. त्यांनी बाळासाहेबांनंतर पक्ष चालवला आहे. त्यांच्याकडून आमच्या काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे, असंही दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर हल्ला

एकनाथ शिंदे  यांच्या बंडाळीनंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ल्याची मालिका सुरु झालीय. मुंबईत मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, पुण्यात तानाजी सावंत, उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांची कार्यालये शिवसैनिकांनी फोडली आहेत. आता शिंदे गटातील सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर  यांच्याही कार्यालयावर हल्ला करण्यात आलाय. दीपक केसरकर यांनी काही तासांपूर्वीच पत्रकार परिषद घेत शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर संध्याकाळी केसरकर यांच्या सावंतवाडीतील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केलाय. दरम्यान, शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.