Eknath Shinde : एकनाथ शिंदे दारुच्या नशेत? व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, जाणून घ्या व्हिडीओमागचं सत्य
हा व्हिडीओ पाहून शिंदे दारुच्या नशेत होते का? असा प्रश्न विचारला जातोय. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही या व्हिडीओवरुन एकनाथ शिंदे यांची नक्कल करत जोरदार टीका केलीय. दरम्यान, शिंदे यांच्या त्या व्हिडीओमागचं नेमकं सत्य जाणून घेणं गरजेचं आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. शिवसेनेत मोठा भूकंप झालाय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 आमदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. अशावेळी शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल सुरु असल्याचं पाहायलाय मिळत आहे. स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, नगरसेवकांच्या बैठका त्यांनी घेतल्या. तर आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षाची कार्यकारिणी बैठक पार पडली. दुसरीकडे आज राज्याच्या राजकारणात आणि सोशल मीडियात एकनाथ शिंदे यांच्या एका व्हिडीओची (Viral Video) चांगलीच चर्चा सुरुय. हा व्हिडीओ पाहून शिंदे दारुच्या नशेत होते का? असा प्रश्न विचारला जातोय. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही या व्हिडीओवरुन एकनाथ शिंदे यांची नक्कल करत जोरदार टीका केलीय. दरम्यान, शिंदे यांच्या त्या व्हिडीओमागचं नेमकं सत्य जाणून घेणं गरजेचं आहे.
एकनाथ शिंदे यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ अवघ्या 30 सेकंदांचा आहे. हा व्हिडीओ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तुफान व्हायरल केला जातोय. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. तो व्हिडीओ पाहून शिंदे दारुच्या नशेत होते का? असा प्रश्न विचारला जातोय. मात्र हे सत्य नाही. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर आमदार सूरत विमानतळावरुन गुवाहाटीला जात होते. त्यावेळी सूरत विमानतळावर माध्यमांच्या प्रतिनिधींची प्रचंड गर्दी केली होती. बसेसमधून शिंदे आणि सर्व आमदार उतरल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी सर्व माध्यम प्रतिनिधी तुटून पडले. तेव्हा तिथे सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी त्या सर्वांना अगदी पळवतच विमानतळ परिसरात नेलं होतं.
What’s going on? Is Shinde normal? Can’t walk or even speak? What’s he high on? pic.twitter.com/SL89LYikUe
— Swati Chaturvedi (@bainjal) June 25, 2022
हा संपूर्ण व्हिडीओ 2 मिनिटांचा आहे. पण त्यातील 30 सेकंदाची क्लिप व्हायरल केली जातेय. माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींच्या कोंडाळ्यात आणि पोलिसांच्या घाई गडबडीत शिंदे यांना व्यवस्थित उभे राहता येत नव्हते. शिंदे हे दारूच्या नशेत नव्हते. तर त्यांना गर्दीमुळे उभे राहता येत नव्हते. मात्र, बसमधून उतरताना आणि सर्व आमदार विमानतळ परिसरात पोहोचल्यानंतर चेक इन करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली होती.
Rebel Shiv Sena leader Shinde. Was drunk on power or just drunk? pic.twitter.com/AY1NDBpCjm
— Prashant Bhushan (@pbhushan1) June 25, 2022