आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन; ‘स्टार प्रचारक’पद काढलं; काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा झटका
आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मोठा झटका दिला आहे.
नवी दिल्ली: आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मोठा झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचं स्टार प्रचारकांच्या यादीतील नाव हटवलं आहे. त्यामुळे कमलनाथ मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत प्रचार करू शकणार असले तरी त्यांच्या प्रचाराचा खर्च पक्षाला नव्हे तर उमेदवाराला द्यावा लागणार आहे. (Election Commission revokes Congress’ Kamal Nath’s star campaigner status )
कमलनाथ यांच्याकडून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या, त्यामुळे त्यांचं स्टार कँम्पेनरपद काढून घेण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं आहे. कमलनाथ यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांना आयटम संबोधले होते. तसेच शिवराज सिंह चौहान यांना नौटंकी कलाकार म्हटलं होतं.
मध्यप्रदेशच्या सीईओने सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर ही कारवाई केली आहे. या अहवालात कमलनाथ यांनी आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन केल्याचं नमूद करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कमलनाथ यांना निवडणूक आयोगाकडून वारंवार समजही देण्यात आली होती. मात्र, तरीही त्यांनी त्याकडे कानाडोळा करत आचारसंहितेचं उल्लंघन केलं. त्यामुळे अखेर त्यांना आदर्श आचार संहिता अनुच्छेद 1 आणि 2 अन्वये दोषी ठरवून कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशात 28 जागांवर विधानसभेसाठी पोटनिवडणुका होत आहेत. येत्या 3 नोव्हेंबर रोजी या जागांसाठी मतदान होणार असून 10 नोव्हेंबर रोजी या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. (Election Commission revokes Congress’ Kamal Nath’s star campaigner status )
संबंधित बातम्या:
‘त्या’ वक्तव्यावरुन राहुल गांधींनी कमलनाथांना जाहीरपणे फटकारले, म्हणाले…
आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल कमलनाथ यांची अखेर दिलगिरी, राष्ट्रीय महिला आयोगाकडून मात्र नोटीस
(Election Commission revokes Congress’ Kamal Nath’s star campaigner status )