मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया, कशासाठी करण्यात आली शस्त्रक्रिया

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळचे अंधूक दिसू लागले होते. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करत शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया, कशासाठी करण्यात आली शस्त्रक्रिया
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 12:55 PM

मुंबई, दि.2 फेब्रुवारी 2024 | राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्या डोळ्यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास होत होता. त्यानंतर डॉक्टरांकडून त्यांनी डोळ्याची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी लेझर ट्रिटमेंटद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी सकाळी ९ वाजता शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

आधी नातवाचा वाढदिवस नंतर शस्त्रक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी संध्याकाळी त्यांचा नातू रुद्रांश यांचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. ठाण्यातील निवासस्थानी त्यासाठी कार्यक्रम झाला. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली. ठाणे येथील माजीवाडा येथील एका प्रख्यात डॉक्टरांकडून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे.

चष्म्याचा नंबर बदलल्याने समस्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चष्म्याचा नंबर बदलला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळचे अंधूक दिसू लागले होते. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करत शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.

हे सुद्धा वाचा

एकाच महिन्यात तिघांचे वाढदिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस चार फेब्रवारी रोजी आहे. त्यानिमित्त ठाण्यात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आमची निष्ठा….. कालपण इथेच होती, आजपण इथेच आहे, उद्यापण इथेच राहणार….महाराष्ट्राचे भाग्यविधाते असा उल्लेख असलेले बॅनर शहरात झळकत आहे. बॅनरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन खासदार शिंदे यांच्याकडून केले जात आहे.

1 फेब्रुवारी रोजी रुद्रांश याचा 4 फेब्रुवारीला खासदार श्रीकांत शिंदे तर 9 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. एकाच महिन्यात तिघांचे वाढदिवस येत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.