Goa Political Crisis : गोवा काँग्रेसकडे 6 आमदार, इतर आमदारांनीही परतावं; अमित पाटकरांचं आवाहन, भाजपवर गंभीर आरोप
काँग्रेसकडून रविवारी रात्री पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी काँग्रेससोबत 6 आमदार असल्याचा दावा अमित पाटकर (Amit Patkar) यांनी केल्या. तसंच भाजपवर घोडेबाजाराचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर आता गोव्यातही मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. गोव्यात विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael Lobo) आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह काही आमदार भाजपवासी होण्याच्या मार्गावर आहेत. तसंच गोवा काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडून वेगळा गट निर्माण करण्याचा महाराष्ट्रातील पॅटर्न गोव्यातही राबवला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशावेळी मायकल लोबो यांची काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदावरुन (Opposition Leader) हकालपट्टी केलीय. तसंच लोबो आणि दिगंबर कामत यांच्यावर कारवाई होणार असल्याचंही काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. दरम्यान, काँग्रेसकडून रविवारी रात्री पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी काँग्रेससोबत 6 आमदार असल्याचा दावा अमित पाटकर (Amit Patkar) यांनी केल्या. तसंच भाजपवर घोडेबाजाराचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय.
अमित पाटकर म्हणाले की, संकल्प आमोणकर, कार्लूस फेरेरा, युरी आलेमांव, रूदोल्फ फर्नांडिस, आल्टन डिकॉस्ता हे आमदार काँग्रेस पक्षासोबत आहेत. तर अन्य एक आमदार आमच्यासोबत आहे. उर्वरित आमदारांनी अजूनही फेरविचार करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तसंच मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांचे भाजपशी संधान होते. पक्षाकडून दोघाही विरोधात कारवाई केली जाईल, असा इशाराही पाटकर यांनी दिलाय. इतकंच नाही तर मायकेल लोबो यांची गोव्याच्या विरोधी पक्षनेतेपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात आल्याचे काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं.
Congress removes Michael Lobo from post of Leader of Opposition in Goa Assembly: Party’s Goa desk in-charge Dinesh Gundu Rao
— Press Trust of India (@PTI_News) July 10, 2022
‘आमदारांनीही विचार करून पक्षात परत यावं’
मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. दिगंबर कामत यांनी पाठीत खंजीर खुपसला, अशी खंतही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान दोन्ही नेत्यांवर कारवाई होणार असा इशाराही दिनेश गुंडू राव यांनी दिला. सध्या काँग्रेसकडे 6 आमदार आहेत. इतर आमदारांनीही विचार करून पक्षात परत यावं, असं आवाहन अमित पाटकर यांनी केलं.
Press Conference by A.I.C.C In-Charge Mr Dinesh Gundu Rao ,GPCC President Amit and other Congress Leaders https://t.co/hy89wFnhEk
— Goa Congress (@INCGoa) July 10, 2022
‘अनेक लोकांना मोठ्या रकमेची ऑफर’
“आमचे किमान 8 आमदार निघून जावेत यासाठी भाजप दोन तृतियांश विभाजनाचा प्रयत्न करत होता. आमच्या अनेक लोकांना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. ऑफर केलेल्या रकमेने मला धक्का बसला आहे. पण आमचे 6 आमदार ठाम राहिले, मला त्यांचा अभिमान आहे”, असंही पाटकर म्हणाले.
Goa Congress leader Michael Lobo and former CM Digamber Kamat were hatching conspiracy against party by hobnobbing with BJP; Cong to act against them: Dinesh Gundu Rao
— Press Trust of India (@PTI_News) July 10, 2022
‘काँग्रेस पक्ष निराश होणार नाही, कमकुवत होणार नाही’
लवकरच नवा नेता निवडला जाईल. या पक्षांतराच्या विरोधात कायद्याने जी काही कारवाई करावी लागेल, ती पक्षविरोधी काम करेल. बघू किती लोक राहतील. आमचे 5 आमदार येथे आहेत, आम्ही आणखी काही आमदारांच्या संपर्कात आहोत आणि ते आमच्यासोबत असतील. काँग्रेस पक्ष निराश होणार नाही, कमकुवत होणार नाही. हा मुद्दा आम्ही अधिक आक्रमकपणे मांडू. सत्तेसाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी 2 जणांनी केलेला हा विश्वासघात आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.