टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांनी आता आदित्य ठाकरेंना डिवचले

मोफत लसीकरणावरून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्येच एक वाक्यता असल्याचं दिसत नाही. (gopichand padalkar slams aditya thackeray over free vaccination)

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांनी आता आदित्य ठाकरेंना डिवचले
गोपीचंद पडळकर आणि आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 10:51 AM

मुंबई: मोफत लसीकरणावरून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्येच एक वाक्यता असल्याचं दिसत नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लसीकरणाबाबतचं ट्विट डिलीट केल्याने हा गोंधळ अधिकच समोर आला आहे. आघाडीतील या गोंधळावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. (gopichand padalkar slams aditya thackeray over free vaccination)

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून हा निशाणा साधला आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केलं. ते ऐकून खूप आनंद झाला. पण काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय त्यांनी मागे घेऊ नये, असंही ते म्हणाले.

काय होतं ट्विट

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मोफत लसीकरणावर भाष्य केलं होतं. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं होतं. त्यामुळे विरोधकांनी आदित्य यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

मलिक काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. (gopichand padalkar slams aditya thackeray over free vaccination)

संबंधित बातम्या:

18 ते 45 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारकडून मोफत लसीकरण, नवाब मलिक यांची माहिती

मुंबईत घरोघरी नाही, पण वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार: महापौर किशोरी पेडणेकर

महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळण्याची चिन्हं, अजित पवारांचे संकेत, ग्लोबल टेंडर काढणार

(gopichand padalkar slams aditya thackeray over free vaccination)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.