AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopinath Munde ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यालयाचे थोड्याचवेळात उद्घाटन

लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे आज सायंकाळी सहा वाजता पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न होणार आहे.

Gopinath Munde ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यालयाचे थोड्याचवेळात उद्घाटन
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यालयाचे थोड्याचवेळात उद्घाटनImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 4:28 PM
Share

पुणे – लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे आज सायंकाळी सहा वाजता पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न होणार आहे. या महामंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषद उपाध्यक्षा डॉ. नीलम ताई गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांसह राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद तसेच विधानसभा सदस्य, विविध ऊसतोड कामगार व वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी व स्वतः ऊसतोड कामगार बांधव उपस्थित राहणार आहेत.

लहानपणापासून ऊसतोड कामगारांचा संघर्ष पाहिला

अगदी लहानपणापासून ऊसतोड कामगारांचा संघर्ष, त्यांची पिढ्यानपिढ्या होत असलेली हेळसांड पाहत असताना, मनाला वेदना होत असत. समाजकारणात सक्रिय झाल्यापासून या प्रवर्गासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहितरी विधायक करण्याचा माझा मानस राहिलेला आहे. यादृष्टीने आम्ही सत्तेत आल्यापासून मी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

आयुष्यातील एक सुवर्णक्षण आहे

आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप येत असून हा आपल्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऊसतोड कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. हा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक असून, मी निवडून आलो, मंत्री झालो, त्याहीपेक्षा हा मोठा दिवस असल्याची भावनिक प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे व या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Nashik : नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले

Sujat Ambedkar: ‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’ सुजातचं चॅलेंज ‘राजपुत्र’ स्वीकारणार?

देवेंद्र भाऊ आमचं मविआचे काम उत्तम चाललंय, तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतलं तर अजून उत्तम चालेल: अशोक चव्हाण

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.