Gram panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर वन; चंद्रकांत पाटलांकडून कार्यकर्त्यांचे अभिनंदन; जाणून घ्या कुणाकडे किती ग्रामपंचायती?

'निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने टिकविली आहे. या यशाबद्दल आपण भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.

Gram panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर वन; चंद्रकांत पाटलांकडून कार्यकर्त्यांचे अभिनंदन; जाणून घ्या कुणाकडे किती ग्रामपंचायती?
ग्रामपंचायत निवडणूक भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्षImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 7:44 PM

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये (Gram panchayat Election) भारतीय जनता पार्टीने पहिला क्रमांक मिळवलाय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर शिंदे गट तिसऱ्या तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय. निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने टिकविली आहे. या यशाबद्दल आपण भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.

‘जनतेने युतीला पसंती दिली’

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शुक्रवारी दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यात ठिकठिकाणी काल मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निर्विवाद यश मिळविलं आहे. भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मिळविलेल्या विजयाचा विचार केला तर भाजपा – शिवसेना युती आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा खूप पुढे आहे. या यशाबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. राज्यात सत्ताबदल होऊन भाजपा – शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेली ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे व त्यामध्ये जनतेने युतीला पसंती दिली आहे.

‘आगामी निवडणुकांमध्येही भाजपच नंबर वन ठरेल’

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे आणि विकासाचा अजेंडा राबविणारे युतीचे सरकार हवे या भूमिकेतून बदल झाला. त्यानंतर जनतेने दिलेला आशिर्वाद खूप महत्त्वाचा आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय.

राज्यात कुणाकडे किती ग्रामपंचायती? (आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार)

भाजप – 80 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजय राष्ट्रवादी काँग्रेस – 50 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजय शिंदे गट – 40 ग्रामपंचायत ताब्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) – 27 ग्रामपंचायतींवर विजय काँग्रेस – 22 ग्रामपंचायत ताब्यात

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.