पैठण शिंदेंचेच! अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावंतांडा ग्रामपंचायतीतून प्रस्थापित पक्ष हद्दपार, 7 पैकी 6 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा
पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा फडकलायं. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झालायं. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील तेरा ग्रामपंचायतीसाठी (Gram Panchayat) गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. आज मतमोजणी होणार असून सकाळी नऊ वाजता मतमोजणीस सुरुवात झालीय. दुपारी बारानंतर निकाल (Result) हाती येतील. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचा समावेश असून तीन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात तर एक काँग्रेस (Congress) आणि एक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे यात आपले वर्चस्व कोण काय राखणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा
पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा फडकलायं. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झालायं. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत. पैठण तालुक्यात बंडखोरीनंतर शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे. म्हणजेच काय तर शिंदे गटाने ग्रामपंचायतीवर देखील आपले वर्चस्व केले आहे.
अंबाजोगाईच्या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचाच नजरा
बीड जिल्हातील कोणतीही निवडणूक असो ती कायमच चर्चेत राहते. अंबाजोगाई तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचा समावेश असून तीन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. पंकजा मुंडेंच्या बालेकिल्लात यंदाही या तीन ग्रामपंचायती भाजपाच्याच ताब्यात राहतील की, राष्ट्रवादी वरचढ ठरेल हे काही मिनिटांमध्येच स्पष्ट होणार आहे. मात्र, अंबाजोगाईच्या या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचाच नजरा लागल्या आहेत.
पुढील काही तासात सर्वच निवडणुकीचे निकाल हाती
राज्यातील ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुढील काही तासात निवडणुकीचे निकाल हाती येतील. वाळूज औद्योगिक परिसराला लागून असलेल्या वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान पार पडले. आता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. वडगाव कोल्हाटीत 60% मतदान झाले.