Aurangabad | ग्रामपंचायत निवडणुकांत शिंदे गट पाय रोवतोय… वाचा मराठवाड्यात कुठे कोणते पॅनल विजयी, मविआच्या ताब्यात कोणती गावं?

औरंगाबादमध्ये प्रतिष्ठेची ठरलेल्या वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचयतीवर देखील शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्या पॅनलचा सुरुवातीलाच दणदणीत विजय झाल्याचे दिसून आले आहे.

Aurangabad | ग्रामपंचायत निवडणुकांत शिंदे गट पाय रोवतोय... वाचा मराठवाड्यात कुठे कोणते पॅनल विजयी, मविआच्या ताब्यात कोणती गावं?
औरंगाबाद ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 12:14 PM

औरंगाबादः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसेनेत उभी फूट पडली असून जनता जनार्दन आता कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election) निकाल हाती आले आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद (Osmanabad) आदी ठिकाणचे निकाल जाहीर होत आहेत. यापैकी बहुतांश ठिकाणी एकनाथ शिंदे पुरस्कृत पॅनलचा विजय होताना दिसतोय. औरंगाबादमध्ये प्रतिष्ठेची ठरलेल्या वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचयतीवर देखील शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्या पॅनलचा सुरुवातीलाच दणदणीत विजय झाल्याचे दिसून आले आहे. मराठवाड्यातील सर्व ग्रामपंचायतींचे निकाल येणं अद्याप बाकी असून सुरुवातीला लागलेल्या निकालांची माहिती येथे देण्यात आली आहे.

औरंगाबादेत शिरसाटांचा प्रभाव कायम

  •  औरंगाबादेत वडगाव-कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीवर १७ जागांपैकी ५ जागांवर आमदार संजय शिरसाट यांच्या गटाचा विजय झाला आहे. यात सुनिल काळे, सुनीता साळे, छायाताई प्रधान, विष्णू उगले, माधुरी सोमासे यांचा विजय झाला आहे.
  • पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय येथे झाला. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आल्याचं दिसून येतंय.
  • अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातही शिंदे गटाने झेंडा फडकवला. तीन पैकी 2 ग्रामपंचायतवर शिंदे गट विजयी झाला आहे.  नानेगाव आणि जंजाळ या दोन ग्रामपंचायत अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आल्या आहेत.

लातूरात महाविकास आघाडीला कौल

  • लातूर जिल्ह्यातल्या पानगाव या मोठया ग्राम पंचायतीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. येथे काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून पॅनल उभे केले होते. त्यात त्यांना यश मिळाले आहे. या ग्राम पंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पानगाव ही ग्राम पंचायत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील महत्वाची ग्राम पंचायत मानली जाते.
  •  लातूर जिल्ह्यातल्या ग्राम पंचायत निवडणुकीत रेणापूर तालुक्यातली रामवाडी ही ग्राम पंचायत भाजपा प्रणित प्यानेलने जिंकली आहे. येथे महेंद्र गोडभरले आणि सुरेंद्र गोडभरले यांच्या प्यानेलने विजयी मिळवला आहे.

उस्मानाबादेत भाजपचं कमळ

  • -उस्मानाबादेत कळंब तालुक्यातील दाभा ग्रामपंच्यातीवर भाजपचा झेंडा. 7 पैकी 6 जागा जिंकत भाजपचा एक हाती विजय. महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर विजय मिळाला. सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. या जागेवरही भाजपचा उमेदवार निवडून आल्याने सरपंच भाजपचा होणार हे निश्चित झाले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत येथे झाली.
  •  उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कामठा गावात सत्ताधारी भाजपला धक्का बसला असून सर्वपक्षीय पॅनल विजयी

परभणीत भाजप-राष्ट्रवादीची युती

  • राज्यात भाजप , एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचा सत्ता संघर्ष सुरू असतांना परभणीच्या सेलू येथे भाजप-राष्ट्रवादीने युती करत मारली बाजी .
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.