अंबाजोगाई तालुक्यात पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम, काँग्रेस बीड जिल्ह्यातून हद्दपार, वाचा बीड जिल्हातील ग्रामपंचायत निवडणूकीचे सर्व निकाल एका क्लिकवर

भाजपने दगडवाडी, श्रीपतरायवाडी, चनई या तीन ग्रामपंचायतीवर विजय मिळवला तर लोखंडी सावरगाव या ठिकाणी राष्ट्रवादीने विजय मिळवला. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्ष गट तट बाजूला ठेवून निवडणुका लढल्या जातात. यातच अभद्र युती सुद्धा पाहायला मिळते.

अंबाजोगाई तालुक्यात पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम, काँग्रेस बीड जिल्ह्यातून हद्दपार, वाचा बीड जिल्हातील ग्रामपंचायत निवडणूकीचे सर्व निकाल एका क्लिकवर
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 3:27 PM

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतीसाठी काल निवडणूका पार पडल्या. त्याचे आज निकाल जाहीर झाले आहेत. अंबाजोगाई तालुक्यात पंकजा मुंडेचे वर्चस्व कायम आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप अव्वल स्थानी तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी पोहचले आहे. शिंदे गटाने देखील दोन ग्रामपंचायतीवर (Gram Panchayat) झेंडा फडकवला आहे. शिवसेनेने गवळवाडी ग्रामपंचायतीसह तीन ठिकाणी यश मिळविले आहे. पाच पैकी तीन ग्रामपंचायतमध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित येत काँग्रेसला (Congress) धूळ चारलीयं. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपने बाजी मारत तीन ग्रामपंचायतवर विजय मिळवला. यात मोरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित येत काँग्रेसला धक्का दिला आहे.

बीड जिल्हात भाजपा पक्ष ठरला अव्वल

भाजपने दगडवाडी, श्रीपतरायवाडी, चनई या तीन ग्रामपंचायतीवर विजय मिळवला तर लोखंडी सावरगाव या ठिकाणी राष्ट्रवादीने विजय मिळवला. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्ष गट तट बाजूला ठेवून निवडणुका लढल्या जातात. यातच अभद्र युती सुद्धा पाहायला मिळते. मात्र, बीड जिल्हात पंकजा मुंडेंचा करिश्मा कायम दिलायं. आता ग्रामपंचायतमधून काँग्रेसला हद्दपार करण्यात आलायं.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडेंचा जिल्हात करिश्मा कायम

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, गेवराई आणि बीड तालुक्यातील 13 ग्रामपंचायती साठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली. अंबाजोगाई 5, गेवराई 5 आणि बीड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतचा समावेश होता. बीड तालुक्यातील गवळवाडी ग्रामपंचायतवर शिवसेनेने निर्विवाद भगवा फडकविला आहे. तर इतर दोन ठिकाणी स्थानिक आघाडी करून जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी ग्रामपंचायतीवर ताबा मिळविला आहे.

बीड तालुका

1. गवळवाडी- शिवसेना 2. अंथरवण पिंपरी- शिंदे गट 3. अंथरवन पिंपरी तांडा- शिंदे गट, स्थानिक आघाडी

गेवराई तालुका

1. सिरसमार्ग – राष्ट्रवादी 2. दिमाखवाडी – राष्ट्रवादी 3. पाचेगाव – राष्ट्रवादी 4. जयराम तांडा – अपक्ष 5. वसंत नगर तांडा – भाजप – शिवसेना

अंबाजोगाई तालुका

1. मोरेवाडी- भाजप,राष्ट्रवादी 2. चनई- भाजप 3. लोखंडी सावरगाव- राष्ट्रवादी 4. दगडवाडी- भाजप 5. श्रीपतवाडी- भाजप

एकनाथ शिंदे गटानेही बीडमध्ये मारली बाजी

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी कायम आहे. पाच ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकलायं. तीन ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व असून शिंदे गटाचा दोन ग्रामपंचायतीवर विजय मिळवण्यात यश मिळाले आहे. गेवराईत अपक्षाने मारली बाजी मारलीयं. ग्रामपंचायत निवडणुकीत बीड जिल्हात काँग्रेसचा पत्ता कट झालायं. बीड जिल्हातील कोणतीही निवडणूक असो ती कायमच चर्चेत राहते.

एकनाथ शिंदे गटाचा बीडमध्ये जल्लोष

शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपसोबत सत्तेत आलेले एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील या निवडणुकीत यश मिळविले आहे. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वात दोन ठिकाणी स्थानिक आघाडी सोबत शिंदे गटाचा पहिला विजयी झेंडा फडकवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचा बीड जिल्ह्यातला हा पहिलाच विजय आहे. त्यामुळे शिंदे गटाने मोठा जल्लोष केला आहे.

बीड भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले की…

केवळ 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असल्या तरी या निवडणुकीत मात्र भाजपने करिष्मा दाखविला आहे. मात्र गेवराईचे विद्यमान आमदारांना ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. 13 जागांपैकी तब्बल 5 ठिकाणी निर्विवाद तर दोन ठिकाणी स्थानिक आघाडी करून भाजप अव्वल ठिकाणी पोहचला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न फडणवीस- शिंदे सरकारने सोडविल्यामुळे मतदारांचा कौल आम्हाला मिळाला अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिलीय.

नमिता मुंदडा यांनी गड राखून भाजपला अव्वलस्थानी नेले

सलग दुसऱ्यांदा गेवराई मतदार संघातून निवडून आलेले भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांना मात्र या निवडणुकीत पराजयाला सामोरे जावे लागले आहे. तर केज मतदार संघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी गड राखून भाजपला अव्वलस्थानी नेले आहे. आगामी काळात नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भाजप आघाडीवर असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात होते. तेंव्हा आणि आता सत्ता नसताना राष्ट्रवादी आणि सेनेची पिछाडी येणाऱ्या निवडणुक काळात धोक्याची घंटा आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठ्या परिश्रमाची गरज आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.