रिक्षातून जात होते केजरीवाल; गुजरात पोलिसांनी भर रस्त्यात रोखले आणि मग…

केजरीवाल एका रिक्षात बसले, तेव्हा पोलीस लगेच तिथे आले आणि त्यांनी केजरीवाल यांना रिक्षात बसण्यापासून रोखले. त्यावरून केजरीवाल आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

रिक्षातून जात होते केजरीवाल; गुजरात पोलिसांनी भर रस्त्यात रोखले आणि मग...
अरविंद केजरीवालImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 11:04 PM

अहमदाबाद : दिल्ली, पंजाबपाठोपाठ आता गुजरात काबीज करण्याचा निर्धार आम आदमी पार्टी (Aam Adami Party)ने केला आहे. त्या अनुषंगाने पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) हे गुजरातमध्ये आपला जनसंपर्क आणखी भक्कम करीत आहेत. याचदरम्यान त्यांना गुजरातमधील सत्ताधारी भाजपकडून शह देण्याचाही प्रयत्न सुरु आहेत. दोन पक्षांमधील शीतयुद्व गेल्या काही दिवसांत चव्हाट्यावर येऊ लागले आहे. अशातच सोमवारी केजरीवाल यांची अहमदाबाद पोलिसांशी बाचाबाची झाली. याला निमित्त होते, ते पोलिसांनी रोखलेल्या रिक्षा (Rikshaw) प्रवासाचे.

केजरीवाल एका रिक्षात बसले, तेव्हा पोलीस लगेच तिथे आले आणि त्यांनी केजरीवाल यांना रिक्षात बसण्यापासून रोखले. त्यावरून केजरीवाल आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. हा प्रकार गुजरातसह सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

पोलीस जबरदस्ती करताहेत – केजरीवाल

केजरीवाल यांना सोमवारी अहमदाबादमध्ये पोलिसांनी ऑटोमध्ये बसण्यापासून रोखले. यावेळी पोलिसांनी सुरक्षेचा हवाला दिला. मात्र त्यावरून वातावरण शांत झाले नाही, उलट काही काळ जोरदार वादावादी झाली.

हे सुद्धा वाचा

संतप्त झालेल्या केजरीवालांनी पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. तुम्ही मला जबरदस्तीने सुरक्षा देत आहात. मला हे संरक्षण नको आहे, असे म्हणणे केजरीवाल यांनी मांडले.

ऑटो चालकाच्या घरी जेवायला चालले होते केजरीवाल

वास्तविक, केजरीवाल हे त्यांच्या हॉटेलमधून एका ऑटोचालकाच्या रिक्षातून त्याच्या घरी जेवणासाठी जात होते. याचदरम्यान पोलिसांनी त्यांना रोखले आणि वादावादीला निमंत्रण मिळाले.

केजरीवाल आणि गुजरात पोलिसांमधील बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात केजरीवाल स्पष्ट बोलत आहेत की, म्हणूनच गुजरातमधील जनता नाराज आहे. कारण नेते जनतेत जात नाहीत.

आम्ही लोकांमध्ये जातोय, म्हणून आम्हाला थांबवले जात आहे. तुमच्या प्रोटोकॉलने जनतेला नाखूष ठेवले आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. आपल्याला पोलीस संरक्षणाची गरज नसल्याचे ते वारंवार सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

काय प्रकरण आहे?

केजरीवाल यांनी सोमवारी अहमदाबादमध्ये रिक्षाचालकांच्या मेळाव्याला संबोधित केले. यादरम्यान एका ड्रायव्हरने केजरीवाल यांना आपल्या घरी जेवण्यासाठी बोलावले. केजरीवाल यांनी त्याची विनंती लगेच स्वीकारली.

त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओही आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये ऑटोचालक केजरीवाल यांना जेवणासाठी आमंत्रित करताना दिसत आहे. विक्रम दत्तानी असे त्या ऑटोचालकाचे नाव आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.