गुजरातमधील शाळांच्या हजेरीत ‘येस सर’ नाही, ‘जय हिंद’!

अहमदाबाद : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमधील शाळांमध्ये ‘जय हिंद’ आणि ‘जय भारत’ या घोषणांचा नाद घुमणार आहे. कारण गुजरातमधील शाळांमध्येही आता हजेरीदरम्यान ‘येस सर’ किंवा ‘प्रेझेंट सर’ असे न म्हणता, विद्यार्थ्यांना ‘जय हिंद’ किंवा ‘जय भारत’ बोलावे लागणार आहे. पहिली ते बारावी या इयत्तांसाठी गुजरात सरकारच्या शिक्षण विभागाने यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच देशभक्तीची […]

गुजरातमधील शाळांच्या हजेरीत 'येस सर' नाही, 'जय हिंद'!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

अहमदाबाद : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमधील शाळांमध्ये ‘जय हिंद’ आणि ‘जय भारत’ या घोषणांचा नाद घुमणार आहे. कारण गुजरातमधील शाळांमध्येही आता हजेरीदरम्यान ‘येस सर’ किंवा ‘प्रेझेंट सर’ असे न म्हणता, विद्यार्थ्यांना ‘जय हिंद’ किंवा ‘जय भारत’ बोलावे लागणार आहे.

पहिली ते बारावी या इयत्तांसाठी गुजरात सरकारच्या शिक्षण विभागाने यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने शिक्षण खात्याने हे पाऊल उचलले आहे. 31 डिसेंबर 2018 रोजी झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्तामोर्तब झाला आणि तसा सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, यासाठी हे पाऊल उचलल्याचे गुजरात राज्याचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी सांगितले. एक जानेवारीपासून म्हणजे नव्या वर्षापासून पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता हजेरीदरम्यान ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंद’ म्हणावे लागणार आहे.

15 मे 2018 रोजी मध्य प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाने सुद्धा अशा प्रकारच्या सूचना सर्व शाळांना दिल्या होत्या. त्यानंतर मध्य प्रदेशात निर्णयाची अंमलबाजवणी सुद्धा झाली होती. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातल्या शाळांमध्ये पहिल्यांदा हजेरीदरम्यान ‘जय हिंद’ बोलण्यास सुरुवात झाली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.