हर्षवर्धन जाधव रावसाहेब दानवेंविरोधात दंड थोपटणार?, जालन्यातून लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत
जालना लोकसभा मतदारसंघात लागलेल्या हर्षवर्धन जाधव यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर त्यांच्या मैत्रिण इशा झा यांचाही फोटो लावण्यात आला आहे. तसंच इशा झा यांच्या नावापुढे जाधव हे आडनावही लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. कारण, हर्षवर्धन जाधव यांनी आता थेट जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जालना लोकसभा मतदारसंघात बॅनल लागले आहेत. त्यामुळे आता जालना लोकसभा मतदारसंघ सासरे विरुद्ध जावई अशी लढाई पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Banners of Harshvardhan Jadhav in Jalna LokSabha constituency)
जालना लोकसभा मतदारसंघातील लोकांची इच्छा असेल तर गेली 25 वर्षे सुरु असलेलं दानवाच्या राज्याचं रुपांतर आपण रामराज्यात करु, असं म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. महत्वाची बाबत म्हणून जालना लोकसभा मतदारसंघात लागलेल्या हर्षवर्धन जाधव यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर त्यांच्या मैत्रिण इशा झा यांचाही फोटो लावण्यात आला आहे. तसंच इशा झा यांच्या नावापुढे जाधव हे आडनावही लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून सन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता ते जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत मिळत आहेत.
संजना नाही तर इशा आता माझ्या जोडीदार- हर्षवर्धन जाधव
हर्षवर्धन जाधव आता त्यांच्या सहकारी इशा झा यांच्यासह पाहायला मिळतात. दुसरीकडे संजना जाधवही राजकारणात सक्रीय झाल्याचं ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान पाहायला मिळालं. संजना जाधव या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार समारंभात दिसून आल्या. अशावेळी हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात संजना जाधव या माझी पत्नी म्हणून कन्नड-सोयगाव मतदारसंघात फिरत आहेत. ज्या पतीला तुम्ही हा माणूस बरोबर नाही असं म्हणताय, त्याच्या नावाने फिरणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडीओत म्हटलंय.
‘माझ्या जोडीदार आता इशा’
इतकच नाही तर, तुम्ही अत्यंत वाईट पद्धतीनं त्रास देत आहात. ग्रामपंचायत निवडणुकीतही तुम्ही तुमच्याच मुलाविरोधात पॅनल उभा केला. आता पुन्हा मतदारसंघात फिरत असताना तुम्ही संजना हर्षवर्धन जाधव म्हणून फिरत आहात. हा घाणेरडेपणा आहे. राजकारणासाठी, स्वार्थासाठी माणूस किती खाली पडू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणून संजना जाधव आहेत. मी मतदारसंघातील तमाम नागरिकांना सूचना करतो की, माझ्या जोडीदार आता इशा आहेत, असंही जाधव यांनी म्हटलं होतं.
कोण आहेत इशा झा?
इशा झा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या साथीने त्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना बालपणापासूनच समाज कल्याणाविषयी मनात तळमळ होती. मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबात इशा झा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मेकॅनिक होते. शिक्षण, आरोग्य अशा विषयात इशा झा यांनी काम केलं आहे. इशा झा यांना हर्षवर्धन जाधव यांच्या सहकारी आणि मैत्रीण म्हणून पाहिले जात होते. मात्र हर्षवर्धन जाधवांनी त्यांचा उल्लेख आपला जोडीदार असा करुन देत नातं स्पष्ट केलं.
VIDEO: कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेत भ**गिरी केली नाही, त्यांच्याकडून झाडं लावून घ्या : नितीन गडकरीhttps://t.co/BKuIevXM62#NitinGadkari #TreePlantation #RoadConstruction @nitin_gadkari @OfficeOfNG
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2021
संबंधित बातम्या :
ना आदित्य हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव; मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे
तेजस्विनी जाधवांच्या आशीर्वादाने सभेत भाषण, हर्षवर्धन जाधव यांची मैत्रीण इशा झा यांची चर्चा
Banners of Harshvardhan Jadhav in Jalna LokSabha constituency