‘अन्यथा या सर्व विद्यार्थ्यांना संघटित करुन सरकार विरोधात आंदोलन करू’, सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारला इशारा

सरकारच्या गोंधळ कारभारामुळे महाराष्ट्रातील हजारो होतकरू विद्यार्थी हे परीक्षा पासून वंचित राहिले. तरी सरकारने या विद्यार्थ्यांकरीता पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना संघटित करू सरकार विरोध आंदोलन करू, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलाय.

'अन्यथा या सर्व विद्यार्थ्यांना संघटित करुन सरकार विरोधात आंदोलन करू', सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारला इशारा
सदाभाऊ खोत, राजेश टोपे
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 7:38 PM

मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेत अनेक केंद्रावर गोंधळ झाल्याचा प्रकार हा दिसून आला होता. शहरातील काही केंद्रावर परीक्षा उशिरा सुरू झाल्याचे गोंधळ तर काही केंद्रांवर अनेक विद्यार्थ्यांना हे पेपर देण्यापासून वंचित रहावे लागले. तर पेपर सुरू होण्याआधीच पेपर फुटीचा प्रकार ही घडला. सरकारच्या गोंधळ कारभारामुळे महाराष्ट्रातील हजारो होतकरू विद्यार्थी हे परीक्षा पासून वंचित राहिले. तरी सरकारने या विद्यार्थ्यांकरीता पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना संघटित करू सरकार विरोध आंदोलन करू, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलाय. (Sadabhau Khot warns Thackeray government over confusion in health department exams)

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत रविवारी (24 ऑक्टोबर) तिसऱ्यांदा गोंधळ उडाला होता. परीक्षादरम्यान विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेतलीय. या सर्व गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार आहेत. त्यांनी या गोंधळाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली होती.

‘परीक्षेतील गोंधळाला राजेश टोपे जबाबदार’

“आरोग्य विभागातर्फे परीक्षा घेण्याचे कंत्राट न्यासा कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने केलेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली होती. उत्तर प्रदेश आणि राज्यातील महविकास आघाडी सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आग्रहामुळे याच कंपनीला आज झालेल्या परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे आज परीक्षेत उडालेल्या गोंधळाला आरोग्यमंत्री टोपे हेच जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी भाजपनं केली होती.

‘राज्यातील सैन्य भरती तात्काळ घ्या’

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दोन वर्षापासून सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे मुलांची वयोमर्यादा संपत चालली आहे. सैन्य भरती तात्काळ व्हावी यासाठी रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सैन्य भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने 22 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी सदाभाऊ खोत आणि शिष्टमंडळाचे 3 महत्वाच्या मागण्या केल्या होत्या.

इतर बातम्या : 

एसटी कामगारांना नोकरीवरून काढू नका, नाही तर…; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

‘केंद्र सरकार आणि मोदींबाबत त्यांना कावीळ झालीय’, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर निशाणा

Sadabhau Khot warns Thackeray government over confusion in health department exams

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.