ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टर उड्डाणास अडथळे, मुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा रद्द
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील बड्या सहा मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा नियोजित होता. मात्र ढगाळ हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण कठीण असल्याने मुख्यमंत्री आता पालघर येथील सोहळ्यात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन करणार आहेत.
पालघर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे खराब हवामानामुळे पालघरला (Palghar) जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे पालघरमधील नवीन जिल्हाधिकारी (Palghar collector) इमारतीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आता ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील बड्या सहा मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा नियोजित होता. मात्र ढगाळ हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण कठीण असल्याने मुख्यमंत्री आता पालघर येथील सोहळ्यात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन करणार आहेत.
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे पालघरमधील या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचे दौरे रद्द झाले.
दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, हसन मुश्नीफ, भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, दादा भुसे हे मंत्री आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं नियोजन आहे. मात्र आता खराब हवामानामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन हजर राहतील. दुपारी 12 वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
पालघर जिल्ह्याला 7 वर्षे पूर्ण
पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन 7 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानंतर अखेर मुख्यालयाच्या उद्घाटनाला आजचा मुहूर्त मिळाला.19 ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयाचं उद्घाटन होत आहे. जिल्हा मुख्यालयाचं काम पूर्ण झालं आहे. जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इतर दोन अशी पाच कार्यालये एकाच प्रांगणात आहेत.
पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी 1 ऑगस्ट 2014 रोजी स्वतंत्र पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जिल्हा निर्मितीच्या 7 वर्षांनंतर 66 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जागेत प्रशासकीय इमारत उभी करण्यात आली आहे.
या भव्य अशा आवारात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हापरिषद कार्यालय, प्रशासकीय अ, प्रशासकीय ब अशा 5 इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. या इमारतीमध्ये 40 च्या वर शासकीय कार्यालये चालू होणार आहेत.
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. या ठिकाणी कुपोषणसारखा महत्वाचा प्रश्न आहे. आज उदघाटनानंतर मुख्यमंत्री पालघर जिल्ह्यासाठी काही महत्त्वाची घोषणा करतात का हे पाहणे गरजेचे आहे.
VIDEO : सुपरफास्ट 100
संबंधित बातम्या
नारायण राणे मुंबईत ‘जन आशीर्वाद’ मागणार, शिवाजी पार्कातही जाणार, शिवसेनेवर हल्लाबोल करणार?