अजितदादा आले… एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर सांगूनच टाकलं

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना आपआपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं. एक वर्षभरात तुमची कामं झाली नाही का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना केला आहे.

अजितदादा आले... एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर सांगूनच टाकलं
CM Eknath Shinde Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 6:43 AM

मुंबई : अजित पवार यांच्या रुपाने भाजपला नवा भिडू मिळाला आहे. अजित पवार यांची युतीत एन्ट्री झाल्यामुळे शिंदे गटाची मोठी अडचण झाली आहे. अजित पवार सुद्धा 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत आले आहेत. शिवाय शरद पवार यांच्या सारख्या बलाढ्य नेत्याला मात देऊन ते भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान आलं आहे. आपल्या राजीनाम्याच्या चर्चांवर शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार यांची युतीत एन्ट्री झाल्यानंतर सर्वाधिक कोंडी शिंदे गटाची झाली आहे. शिंदे गटाला विचारात न घेता भाजपने अजित पवार यांना सोबत घेतल्याचं सांगितलं जात आहे. ज्या अजित पवार यांना कंटाळून शिवसेना सोडली, त्याच अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे गटाला काम करावं लागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला वटवृक्ष तुम्ही तोडलात का? असा सवाल आता शिवसैनिक शिंदे गटाला विचारण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा गट सोबत आल्याने शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाल्याने काल मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीत अनेकांनी आपली नाराजी बोलून दाखवल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

राजीनामा देत नाहीये

आमदारांची ही नाराजी असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा इतक्या सुरू झाल्या की स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यावर खुलासा करावा लागला आहे. मी राजीनामा देत नाहीये. या बातम्या कोण पसरवत आहे हे मला चांगलं माहीत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला निराश करणार नाही

माझ्या राजीनाम्याच्या बातम्या कोण प्लांट करत आहे हे मला माहीत आहे. मी राजीनामा देणार नाही. मी 50 आमदारांना निराश करणार नाही. या आमदारांनी संकट काळात मला साथ दिली आहे. त्यामुळे मी त्यांना कधीच निराश करणार नाही, असं शिंदे यांनी आमदारांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

माझच कंट्रोल

2024मध्ये मीच मुख्यमंत्री होणार आहे. अजितदादा पवार आपल्यासोबत आल्याने चिंता करण्याचं कारण नाही. कारण मुख्यमंत्रीपद अजूनही माझ्याकडे आहे. आणि सरकारवर माझच कंट्रोल आहे. अजित पवार यांना सरकारमध्ये घेणं हा राजकीय प्रक्रियेचा एक भाग आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वगळून ही युती झाली आहे. इथे घराणेशाहीला थारा नाही, असं शिंदे म्हणाले.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.