अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझीही इच्छा, पवार घराण्यातील व्यक्तीचंच मोठं विधान; राष्ट्रवादीत काय शिजतंय?

राज्यातील सत्ताधारी सध्या केवळ मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारण करत आहेत. त्यांना महापालिकेशिवाय काहीच दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझीही इच्छा, पवार घराण्यातील व्यक्तीचंच मोठं विधान; राष्ट्रवादीत काय शिजतंय?
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझीही इच्छा, पवार घराण्यातील व्यक्तीचंच मोठं विधानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 3:29 PM

बारामती: दिवाळी (diwali) निमित्ताने एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांना एक बॅनर दिलं. त्यावर भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख होता. त्यामुळे अजित पवार आणि मुख्यमंत्रीपद याची जोरदार चर्चा रंगली. त्यात राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी एक विधान केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही माझीही इच्छा आहे, असं रोहित पवार म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीत काय शिजतंय अशी चर्चा रंगली आहे.

आमदार रोहित पवार यांनी मीडियाशी संवाद ही प्रतिक्रिया व्यक्त केली.वअजितदादा मुख्यमंत्री व्हावेत असं अनेकांचं मत आहे. तसं माझंही मत आहे. शेवटी आकड्यांचं समीकरण बघावं लागतं. येत्या काळात जे काही समीकरण असेल, मित्र पक्षांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल, असं रोहित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नक्कीच एक ताकदवान व्यक्ती जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसतो, ज्याचा प्रशासनावर वचक असतो, ज्याला काम करण्याची पद्धत माहीत असते तेव्हा अख्ख्या प्रशासनाची निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जेव्हा निर्णय पटापटा घेतले जातात तेव्हा त्याचा लोकांना फायदा होतो, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होत असेल तर राज्याला फायदा होईल. अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. आघाडीमध्ये असताना मोठे नेते निर्णय घेत असतात. त्यामुळे जो मुख्यमंत्री होईल तो स्वत: निर्णय घेणारा असावा, असंही त्यांनी सांगितलं.

निलेश आणि नितेश राणे यांना माझ्या मतदारसंघात यायचं असेल तर या. पण निवडून कुणाला द्यायचं हे राज्यातील लोकच ठरवणार. मी हवेत बोलत नाही. कुणाला यायचं असेल तर या. माझा माझ्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे, असंही ते म्हणाले.

राज्यातील सत्ताधारी सध्या केवळ मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारण करत आहेत. त्यांना महापालिकेशिवाय काहीच दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बारामतीच्या विषयावर बोलल्याशिवाय बातमी होत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागच्या वेळी 110 टक्के पाऊस झाल्यावर ओला दुष्काळ जाहीर करण्याची आजच्या सत्ताधाऱ्यांनी मागणी केली होती. आता त्यापेक्षा जास्त पाऊस पडला. मागणी करणारे सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांनी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.