‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’, रामदास आठवले केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून भेटही घेणार

सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम सरकार करत असल्याची टीका भाजप नेते करत आहेत. अशावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.

'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा', रामदास आठवले केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून भेटही घेणार
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 11:58 PM

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांनी नोंदवलेला जबाब आणि आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा, या पार्श्वभूमीवर भाजप चांगलीच आक्रमक झालीय. सरकारकडून दडपशाही सुरु असून पोलिसांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय. सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम सरकार करत असल्याची टीका भाजप नेते करत आहेत. अशावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.

राज्यात सुरु असलेल्या घडामोडीवर बोलताना आठवले म्हणाले की, मी अमित शाहांना एक पत्र लिहिणार आहे. त्यांना भेटणारही आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहे. विरोधकांना सातत्याने त्रास दिला जाणार असेल तर हे सरकार बरखास्त केलं पाहिजे. सरकार बरखास्त करण्याची वेळ नक्की येईल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.

राष्ट्रपती राजवट कधी लागू होते?

दरम्यान, ‘जेव्हा संविधानाने आखुन दिलेल्या प्रक्रियेनुसार राज्य सरकार चालण्यास अक्षम असते आणि राज्य सरकार संविधानाच्या प्रक्रियेनुसार चालु शकत नाही. कायद्याचे राज्य म्हणून अस्तित्वात येऊ शकत नाही, अशा वेळी 354 घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपटी राजवट लावली जाऊ शकते’, अशी माहिती कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले, की सध्या अशी कोणतीही परिस्थिती महाराष्ट्र राज्यात नाही. त्यामुळे कोणलातरी अटक होणे, कोणालातरी गुन्ह्यात अडकवणे किंवा अडकले जाणे, या कारणावरून राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकत नाही.

इतर बातम्या :

Video : ‘आई-बापावर बोलायचं नाही…’, लोकसभेत सुप्रिया सुळे संतापल्या! केंद्रीय मंत्र्यांना सुनावले खडेबोल

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पुन्हा रखडणार, ठाकरे सरकारचा प्रस्ताव राज्यपालांनी परत पाठवला!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.