शरद पवारांकडूनच मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसींचं आरक्षण अबाधित; नवाब मलिकांचं मोठं विधान
त्यानंतर मराठा आरक्षणावरही अनेक नेत्यांनी भाष्य केलं. आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलीय. Mandal Commission Sharad Pawar nawab malik
मुंबईः मराठा आरक्षणावरून सध्या जोरदार राजकारण सुरू झालंय. भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा केला असून, त्यांनी अनेक पक्षातील नेत्यांची मतंही जाणून घेतलीत. त्यानंतर मराठा आरक्षणावरही अनेक नेत्यांनी भाष्य केलं. आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलीय. (Implementation Of Mandal Commission by Sharad Pawar Himself Says Nawab Malik)
शरद पवारसाहेबांनीच मंडल आयोगाची अंमलबजावणी केली
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतलीय. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीची भूमिकाही स्पष्ट केली. शरद पवारसाहेबांनीच मंडल आयोगाची अंमलबजावणी केली, राष्ट्रवादीचं मत आहे, ओबीसींचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे, मराठा आरक्षणाबाबतही आमची भूमिका स्पष्ट आहे, असंही नवाब मलिकांनी स्पष्ट केलंय.
महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं
महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं, आम्ही कायदा केला, भाजप सरकारमध्येही कायदा झाला. पण सध्या कोर्टाकडून रद्द झाला. पण इतर ज्या मागण्या आहेत, त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. शरद पवारसाहेबांनी सांगितलंय, विशेष लक्ष द्या, असंही त्यांनी सांगितलं.
आरक्षण पदोन्नतीबाबत कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही
आरक्षण पदोन्नतीबाबत कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, याकडे लक्ष द्या, त्याबाबतही चर्चा झाल्याचंही नवाब मलिकांनी म्हटलंय. विशेषत: लॉकडाऊनला दहा जूनला निर्बंध पाळून पक्ष कार्यालयावर झेंडावंदन करणार आहोत. महाराष्ट्र कार्यालयात मोजके नेते उपस्थित राहतील. शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष यांच्या फेसबुकवरून लाईव्ह संवाद साधतील, असंही त्यांनी सांगितलंय.
त्यांची भविष्यवाणी खरी ठरली नाही
काल देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटले, आजारातून बरे झाल्यामुळे भेटले. सूचक वक्तव्याचा काहीही संबंध नाही. फडणवीस वारंवार तारीख पे तारीख देत राहिलेत. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली नाही. महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करेल. मुख्यमंत्री म्हणालेत, 5 वर्ष नाही, तर आम्ही 25 वर्षांसाठी एकत्र आलो. भाजपमध्ये लोक चलबिचल आहेत, त्यांना थांबवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील बोलत राहतात. आम्ही खंबीरपणे तीन पक्ष एकमताने कोरोनावर मात करतो, लोकांना न्याय देणे, चांगलं शासन देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही नवाब मलिकांनी सांगितलंय. दावे करून भाजपला यश मिळणार नाही. जोपर्यंत तीन पक्ष एकत्र आहेत, ऑपरेशन लोटस या महाराष्ट्रात होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
संबंधित बातम्या
पंतप्रधानपदासाठी राज ठाकरे यांची ममता बॅनर्जींना पसंती?; राज नेमकं काय म्हणाले वाचा…
वर्ष 2020-21 अर्थव्यवस्थेसाठी ‘गडद’, चुका स्वीकारा आणि विरोधकांचं ऐकाः पी चिदंबरम
Implementation of Mandal Commission by Sharad Pawar himself says nawab malik