BJP Meeting | फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपची मंगळवारी बैठक, महत्त्वाच्या 3 ठरावांवर चर्चा
महाराष्ट्रच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठक मंगळवारी (16 नोव्हेंबर) मुंबईत होणार आहे. या बैठकीत भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण आणि महाविकास आघाडी सरकारकडून झालेली जनतेची फसवणूक या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन पक्षाची आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठक मंगळवारी (16 नोव्हेंबर) मुंबईत होणार आहे. या बैठकीत भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण आणि महाविकास आघाडी सरकारकडून झालेली जनतेची फसवणूक या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन पक्षाची आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. तशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी दिली. ते मुंबईत बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल.
भाजपच्या बैठकीत तीन महत्त्वाच्या ठरावावर चर्चा
भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत तीन ठराव मांडण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा एक ठराव असेल. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि त्याला राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळणारे समर्थन याविषयी एक ठराव असेल. तर महाविकास आघाडी सरकारकडून समाजाच्या सर्वच घटकांची फसवणूक झाली असून त्याची चर्चा राजकीय ठरावात करण्यात येईल. पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनातून आणि ठरावांद्वारे स्पष्ट होईल, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिलीय.
पक्षाचे पदाधिकारी ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी होणार
केशव उपाध्ये यांनी सांगितले की, या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि ओमप्रकाश धुर्वे उपस्थित राहणार आहेत. कार्यकारिणी बैठकीस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष हे मुंबईत उपस्थित राहतील. तसेच विविध जिल्हास्थानी पक्षाचे पदाधिकारी ऑनलाईन पद्धतीने कार्यकारिणी बैठकीत सहभागी होतील.
बैठकीत आणखी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार ?
भाजपच्या मंगळवारच्या बैठकीत तीन ठरावांव्यतिरिक्त आणखी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. मात्र आगामी काळात पक्षाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने असावी, यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या मुंबईसह इतर पालिका निवडणुकीच्या रणनीतीवरदेखील चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :
UP Elections 2022: जिन्नांना पाठिंबा देणारेच तालिबान समर्थक आहेत- योगींची विरोधकांवर टीका
शरद पवार पुढील आठवड्यात नक्षलग्रस्त भागात जाणार, तरुणांशी साधणार संवाद
PHOTO: स्मृती मंधानाची तुफानी खेळी, WBBL मध्ये सिडनी थंडर्सचा दमदार विजयhttps://t.co/2TG1nn5QMH#WBBL | #SmritiMandhana | #T20WorldCup21
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2021