Kurduwadi Nagar Parishad : कुर्डूवाडीत राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल, सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याचा आरोप
कुर्डुवाडी नगरपरिषदेत (Kurduwadi Nagar Parishad) येऊन सरकारी कामात अडथळा घातल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दत्ता गवळी (Datta Gawali) यांच्यासह संतोष टोणपे, फिरोज खान, राजू शेंबडे यांच्यावर मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड (Laxman Ratod) यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर – कुर्डुवाडी नगरपरिषदेत (Kurduwadi Nagar Parishad) येऊन सरकारी कामात अडथळा घातल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दत्ता गवळी (Datta Gawali) यांच्यासह संतोष टोणपे, फिरोज खान, राजू शेंबडे यांच्यावर मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड (Laxman Ratod) यांनी गुन्हा दाखल केला आहे. सणासुदीच्या काळात पाणी का येत नाही हे विचारण्यासाठी आम्ही नगरपरिषदेच्या कार्यालयात गेलो होतो. जाब विचारल्याने आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे दत्ता गवळी यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांचा आम्ही निषेध करीत आहोत.
नेमकं नगरपरिषदेत काय घडलं
शहरातील प्रभागात तीन दिवसांपासून पाणी का सोडले नाही. एम.एस.आर.डी.सीने झाडे तोडली तरी तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल का केला नाही ? या प्रकरणाचा जाब विचारत असताना दत्ता गवळी आणि मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्यात शाब्दिक खंडाजंगी झाली. त्यामुळे सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. गुरूवारी दुपारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार कुर्डुवाडी नगरपालिकेत घडला आहे अशी माहिती माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी तथा राष्ट्रवादीचे नेते दत्ता गवळी यांनी सांगितली.
पोलिस मुख्याधिकारी यांचा बोलण्यास नकार
कुर्डुवाडी नगरपरिषदेत येऊन सरकारी कामात अडथळा घातल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी यावर काहीचं प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच कुर्डुवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याशी सुध्दा बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी सुध्दा बोलण्यास नकार दिला आहे.