शिंदे सरकारने ठाकरे कुटुंबाला घेरलं, मुंबई महापालिकेच्या 25 वर्षाच्या कारभाराची चौकशी

bmc enquiry and uddhav thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे सरकारकडून खेळी खेळली गेली आहे. मुंबई मनपाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्यात येणार आहे. मुंबई मनपाच्या २५ वर्षांच्या कामांचे ऑडीट करण्यात येणार आहे.

शिंदे सरकारने ठाकरे कुटुंबाला घेरलं, मुंबई महापालिकेच्या 25 वर्षाच्या कारभाराची चौकशी
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 12:11 PM

निवृत्ती बाबर, मुंबई | 12 डिसेंबर 2023 : शिंदे सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबई मनपाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अडचण होणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. हिंमत असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनता तुमच्या कामांचे ऑडिट करेल, असा हल्ला ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्याला शिंदे सरकारकडून मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. यामुळे महानगरपालिकेवरुन शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले आहे.

काय म्हणाले उदय सामंत

कोव्हीड काळात मुंबई महानगरपालिकेत झालेला गैरव्यवहार समोर आला आहे. तसेच इतर अनेक गैरव्यवहाराचे आरोप होत आहे. यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई मनपाच्या सर्व आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी श्वेतपत्रिका काढणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. त्यानंतर विरोधकांनी पुणे, ठाणे, नागपूर आणि इतर मनपाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, मुंबई मनपाच्या चौकशीचा निर्णय होताच इतक्या मिर्च्या का झोंबल्या. कोव्हीड सेंटरमध्ये घोटाळे सर्वांसमोर आले. मुंबईनंतर ज्या ठिकाणी आरोप होती, त्या पालिकेची चौकशी केली जाईल. तुम्ही स्वच्छ असाल तर घाबरण्याची गरज काय? अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

विनायक राऊत म्हणतात, निवडणुका घेऊन दाखवा

आमच्याच कारकिर्दीतील नव्हे तर तुमच्या कारकिर्दीतील ऑडिट करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायकर राऊत यांनी केली. हिंमत असेल तर मुंबई मनपाचे निवडणूक घेऊन दाखवा. मग जनताच तुमचे ऑडिट करेल. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन ही चौकशी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.