Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | चौकीदार नाराज? मविआचं काय होणार?

महाविकास आघाडीची ढाल आणि तलवार मानले जाणारे संजय राऊत सध्या नाराज असल्याचं दिसतंय. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल बोलताना राऊतांचे सूर बदलले आहेत. राऊतांचे बदललेले सूर, सुषमा अंधारेंनी अजितदादांची पवारांकडे केलेली तक्रार, पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांमधला वाद यावरुन मविआतच सगळं आलबेल आहे की नाही? हा प्रश्न निर्माण झालाय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | चौकीदार नाराज? मविआचं काय होणार?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 11:58 PM

मुंबई : स्वत:ला महाविकास आघाडीचा चौकीदार म्हणणारे, महाविकास आघाडीची ढाल बनून वार झेलणारे आणि महाविकास आघाडीची बाजू माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर येत भक्कमपणे मांडणारे संजय राऊत नाराज झाले आहेत का? संजय राऊतांमध्ये आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये टोकाचं वितुष्ट आलंय का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. यामागचं कारण आहे, संजय राऊतांचा बदललेला सूर. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. पण राऊतांनी आपल्या चाकोरीबाहेरचं उत्तर दिलं. “राष्ट्रवादीचे वाघ याच्यावर डरकाळी फोडतील”, असं राऊत म्हणाले.

संजय राऊतांना आजही अजित पवार आणि नाना पटोलेंबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्याही वेळी राऊतांनी या दोन नेत्यांवर बोलणं टाळलं आणि जाता जाता टोलाही लगावला. “अजित पवार सर्वोच्च नेते. नाना पटोलेही सर्वोच्च नेते. पटोले आणि पवार पाहून घेतील”, असं उत्तर संजय राऊतांनी दिलं. पण संजय राऊत राष्ट्रवादीवर नाराज का झाले आहेत? उद्धव ठाकरेंचीही राष्ट्रवादीवर खप्पामर्जी झालीय का? खुद्द शरद पवारांनीच याचं उत्तर दिलंय.

शरद पवार यांच्या पुस्तकामुळं उद्धव ठाकरे नाराज झाल्याची चर्चा होती. पवारांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर राऊतांची तोफही काहीशी थंडावली होती. पवारांनी ठाकरेंविषयी पुस्तकात जे लिहिलंय त्यामुळे नाराजी वाढल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी ठाकरेंबद्दल पुस्तकात नेमकं काय म्हटलंय?

उद्धव ठाकरेंना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादा होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. बाळासाहेबांसोबतची संवादातील सहजता उद्धव ठाकरेंशी बोलताना नव्हती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती याचा विचार करुनच भेटण्याची वेळ ठरवावी लागत असे. राज्यातील प्रमुखाला राज्यातील घडामोडींची वित्तंबातमी हवी. त्याचं यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार आजच काय पावलं उचलायला पाहिजेत, हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य हवं.

या सर्व बाबतीत आम्हाला सर्वांनाच कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्यानं हे घडत असलं, तरी ते टाळता आलं असतं. राजकारणात सत्ता राखण्यासाठी वेगानं हालचाली कराव्या लागतात. परंतु महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्प्यात माघार घेतली.

महाविकास आघाडी सरकार हे भाजपला देशभरात मिळालेलं सर्वात मोठं आव्हान होतं. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार, याची कल्पना होतीच. आम्ही आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं, संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळं महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला.

शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

या पुस्तकाच्या प्रकाशनानंतरच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची खेळी खेळली होती. त्याच वेळी ठाकरेंची नाराजीही समोर आली होती. “मी पवारांना काय सल्ला देणार. त्यांच्या तो पचनी पडला नाही तर काय करु?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर अजित पवार आणि संजय राऊतांमध्येही वाकयुद्ध झालं. अजितदादांनी तर कोण संजय राऊत? असा जाहीर सवालच विचारला होता.

दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी अजित पवारांची तक्रार थेट शरद पवारांकडेच केली. यावेळी पवारांच्या समोरच सुषमा अंधारेंना अश्रू अनावर झाले. त्यावरही अजितदादांनी जळजळीत प्रतिक्रिया दिलीय. “विरोधी पक्षनेत्यानं बोलायला हवं होतं”, अशी तक्रार सुषमा अंधारे यांनी केली. त्यावर अजित पवारांनी टोला लगावला. “सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर जाऊन रडायला पाहिजे होतं”, असा टोला त्यांनी लगावला.

अजित पवार यांच्या टीकेवर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही दादांजवळच बोलणार.. दादा आम्हाला का परकं करताय?”, असा प्रश्न त्यांनी केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद

हा झाला ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतला वाद. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही वाद सुरु झाला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं. त्यावरुन शरद पवारांनीही पलटवार केला. राष्ट्रवादीचं भाजपसोबत बोलणं सुरु आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यावर शरद पवारांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या.पृथ्वीराज चव्हाणांना त्यांच्या पक्षात किती किंमत आहे. त्यांच्या सहकाऱ्यांना विचारा, अशी टीका त्यांनी केली.

शरद पवार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल काय बोलले?

शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं सख्ख्य पूर्वीपासूनच नव्हतं. शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख केलाय. “पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव आणि आई प्रेमलाताई यांचंही काँग्रेसमधील स्थान मोठं होतं. परंतु त्यांचा सांधा यशवंतराव चव्हाणसाहेब यांना मानणाऱ्यांशी फारसा कधीच जुळला नव्हता. विशेषत: चव्हाणसाहेबांशी सहमत नसलेल्यांसमवेत त्यांचा घरोबा अधिक होता. चव्हाणसाहेब आणि माझं सौहार्दाचं नातं सर्वश्रूत आहे. त्याच्या परिणामी माझ्यासमवेतही पृथ्वीराज चव्हाण कुटुंबीयांचे सूर फारसे कधी जुळलेले नव्हते”, असं पवार म्हणाले.

“2019 साली अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही आमच्या लक्षात येत होतं. राष्ट्रवादी काँग्रेस हेच आपलं पहिलं लक्ष मानण्याची पृथ्वीराज चव्हाण यांची वागणूक उभय पक्षांच्या संबंधात ताण निर्माण करणारी ठरली”, असं शरद पवारांनी पुस्तकात म्हटलंय.

मविआत आपापसात वाद

जसा वाद राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात आहे, जसा वाद काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आहे, तसाच काहीसा वाद ठाकरे गट आणि काँग्रेसच्याही नेत्यांमध्ये आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे संजय राऊत आणि नाना पटोलेंमध्ये झालेली खडाजंगी. महाविकास आघाडीत काही मुद्द्यांवरुन तात्विक मतभेद आहेत. पण हे मतभेद आता जाहीरपणे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत आणि यात महाविकास आघाडीचे चौकीदार मानले जाणारे संजय राऊतही काहीसे शांत झाले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.