ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?

महाविकास आघाडीला तीन वर्ष झाली आहे. आधी शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळे लढत होते. राजकीय विरोधक होतो. राहुल गांधी यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी कमकुवत होईल.

ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?
ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 3:58 PM

बुलढाणा: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधान केलं. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटानेही राहुल गांधी यांच्या या विधानाशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राहुल गांधी यांना हे विधान करण्याची गरजच नव्हती. अशा विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सारवासारव केली आहे. राहुल गांधी यांच्या विधानाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी हे विधान केलं. राहुल गांधी यांच्या विधानाशी महाविकास आघाडीचं काही घेणंदेणं नाही. महाविकास आघाडीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. हा वेगळा विचार आहे. वेगळा दृष्टीकोण आहे. हे वास्तव आहे, असं जयराम रमेश म्हणाले.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीला तीन वर्ष झाली आहे. आधी शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळे लढत होते. राजकीय विरोधक होतो. राहुल गांधी यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी कमकुवत होईल. महाविकास आघाडी अस्थिर होईल असं सांगितलं जात आहे. त्यांनी सांगितलं नाही. हा वेगळा विचार आहे. चर्चा करू, असंही त्यांनी सांगितलं.

काही राजकीय पक्ष सावरकरांच्या मुद्द्यावरून उगाचच वातावरण तापवत आहेत. त्यांनी वातावरण तापवू नये. ऐतिहासिक सत्य समजून घ्यावं. या संघटना, पक्ष ऐतिहासिक सत्य का नाकारत आहेत? असा सवालही त्यांन केला.

आम्ही कधीच इतिहासाची मोडतोड केली नाही. काँग्रेस नेहमी इतिहासाशी प्रमाणिक राहिली आहे. सर्वात आधी सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर 1942 च्या भारत छोडो, चले जाव चळवलीलाही विरोध केला होता, हे सत्य आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होतं हे सत्य कसे नाकारता? असा सवाल त्यांनी केला.

भारत जोडो यात्रेत बेरोजगारीपासून ते महागाईपर्यंत ते स्त्रियांवरील अत्याचारापर्यंतचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. पण या मुद्द्यांकडे का लक्ष दिलं जात नाही. हा एकच मुद्दा का धरून ठेवला आहे? असा सवालही त्यांनी केला.

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.