जळगावात भाजपचा ‘जलवा’, पण मंत्री गुलाबराव पाटील पास की फेल? नेमके निकाल काय?

जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन यांचं हे होमपीच आहे.

जळगावात भाजपचा 'जलवा', पण मंत्री गुलाबराव पाटील पास की फेल? नेमके निकाल काय?
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 10:28 PM

विकास भदाणे, Tv9 मराठी, जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दहा महिन्यांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींनंतर आगामी काळातही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. कारण राज्याच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल समोर येणार आहे. या निकालाआधी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत वेगवेगळे भाकीत वर्तवण्यात येत आहेत. असं असताना आता राज्यातील जनतेच्या मनात नेमकं काय आहे ते जाणून घेण्यासाठी निवडणूक हे चांगलं माध्यम आहे. आगामी काळात राज्यात महापालिकांच्या निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. त्यानंतर लगेच पुढच्यावर्षी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांआधी आज राज्यातील एकूण 147 बाजार समितींच्या निवडणुकीचा निकाल समोर येतोय. त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष आहे.

जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन यांचं हे होमपीच आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्याने स्थानिक पातळीवर या नेत्यांना नेमकं यश कसं मिळतं याकडे अनेकांचं लक्ष आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील 6 बाजार समित्यांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीला सर्वाधिक जागांवर यश मिळालं आहे.

जळगाव जिल्ह्यातील 6 पैकी 4 बाजार समित्यांमध्ये भाजप-शिंदे गटाला सर्वाधिक जागांवर यश मिळालं आहे. पण दोन बाजार समितीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. गिरीश महाजन यांचं होमग्राउंड असलेलया जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. पण रावेरमध्ये भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ला असलेल्या धरणगाव बाजार समितीची निकाल उद्या समोर येणार आहे. या निकालाला जास्त महत्त्वं आहे.

हे सुद्धा वाचा

चोपडा बाजार समितीत शिंदे गटाच्या सर्वाधित जागा, पण…

चोपडा बाजार समिती येथे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या नेतृत्त्वात भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीच्या बळीराजा पॅनलला 5 जागांवर विजय मिळालाय. तसेच बंडखोर भाजप आणि राष्ट्रवादी प्रणित शेतकरी सहकार पॅनलला 4 जागांवर विजय मिळाला आहे.

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हा महत्त्वाचा आहे. कारण महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांना स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. या बाजार समितीमध्ये काँटे की टक्कर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकमेकांच्या कुबड्या घेऊन या ठिकाणी सत्ता स्थापन करावी लागणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे.

पारोळ्यात शिंदे गटाच्या आमदाराच्या गटाचा सुपडा साफ

जळगाव जिल्ह्यातील पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या पदरी निराशा पडली आहे. पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार चिमणराव पाटील यांच्या गटाचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. त्यांच्या गटाचे फक्त 3 सदस्य निवडून आले आहेत. चिमणराव पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने तब्बल 15 जागांवर विजय मिळवला आहे. सतीश पाटील यांच्यासाठी हे खूप मोठं यश आहे.

जळगाव जिल्ह्यातील 6 बाजार समितींचा निकाल थोडक्यात

1) चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती

भाजप शिंदे गट – 9 महाविकास आघाडी – 4 अपक्ष – 5

2) भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती

भाजप शिंदे गट – 15 महाविकास आघाडी – 3

3) जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती

भाजप शिंदे गट – 18

4) चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

भाजप शिंदे गट – 13

महाविकास आघाडी – 5

5) रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती

महाविकास आघाडी – 13 भाजप शिंदे गट – 3 अपक्ष – 2

6) पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती

महाविकास आघाडी – 15 भाजप-शिंदे गट – 3

एकूण

भाजप शिंदे गट – 61

महाविकास आघाडी – 40

अपक्ष – 7

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.