एकाच घरात विरोधक-सत्ताधारी, पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता, दोघं शिवसैनिक, जळगावातील अनोखं राजकारण

जळगाव महापालिकेत सध्या अनोख्या राजकारणाचं दर्शन बघायला मिळतंय (Jalgaon Politics Jayshree Mahajan is mayor and his husband opposition leader)

एकाच घरात विरोधक-सत्ताधारी, पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता, दोघं शिवसैनिक, जळगावातील अनोखं राजकारण
पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता, दोघं शिवसैनिक
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 11:46 PM

जळगाव : जळगाव महापालिकेत सध्या अनोख्या राजकारणाचं दर्शन बघायला मिळतंय. महापालिकेवर सध्या महाविकास आघाडी पूरस्कृत शिवसेनेची सत्ता आहे. महापालिकेच्या महापौर या शिवसेनेच्या जयश्री महाजन या आहेत. तर त्यांचे पती सुनील महाजन हे महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत. विशेष म्हणजे दोघं शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत. आताही ते शिवसेनेतच आहेत. पण पत्नी शिवसेनेची महापौर तर पती शिवसेनेचाच विरोधी पक्षनेता आहे (Jalgaon Politics Jayshree Mahajan is mayor and his husband opposition leader).

नेमकं कारण काय?

जळगाव महापालिकेत नुकतेच सत्तांतर झाल. शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता मिळवली. त्यानंतर शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी विराजमान झाल्या. त्यावेळी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे होते. महाजन यांचे पती सुनील महाजन विरोधी पक्ष नेते होते ते आजही आहेत. त्यामुळे एकाच घरात महापालिकेतील महापौर आणि विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पदे आहेत.

महापौर निवडणुकीत भाजपचे आमदार फुटले

जळगाव महापालिकेत 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत 75 जागांपैकी भाजपला 57 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला 15 आणि एमआयएम पक्षाला तीन जागा मिळाल्या. त्यामुळे भाजप सत्ताधारी तर शिवसेना विरोधी पक्ष होता. अडीच वर्षांनी महिला राखीव असलेल्या महापौर पदासाठी निवडणूक लागली अन याच ठिकाणी मोठे उलटफेर झाले. भाजपचे तब्बल 30 नगरसेवक फुटले. तर एमआयएमनेही सेनेला पाठिंबा दिला आणि शिवसेनेकडे सत्ता आली.

भाजपकडून अद्याप विरोधी पक्षनेते पदाचा दावा नाही

शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या पत्नी महापौर झाल्या. तर शिवसेनेकडे तांत्रिकरित्या विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यामुळे सुनील महाजन हेच विरोधी पक्षनेते आहेत. सत्तांतर झाल्यानंतर जळगाव महापालिकेची पहिली महासभा ऑनलाईन उद्या होत आहे. पत्नी महापौर जयश्री महाजन व्यासपीठावर असतील तर पती सुनील महाजन विरोधी पक्षनेते असतील. भारतीय जनता पक्षाने आद्यापही विरोधी पक्षनेते पदाचा दावा केलेला नाही.

हेही वाचा : ‘तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर राज्यात युतीची सत्ता असती’, गुलाबराव पाटलांची महाजनांवर कोटी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.