भाजपचे फडणवीस, दानवेंच्या जलाक्रोशानं जालना दणाणलं, राष्ट्रवादी नेते पालकमंत्री राजेश टोपेंचं उत्तर पहा किती शांत..VIDEO

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची हत्याही या सरकारनं केली. त्यामुळे राज्यपालांना मराठवाड्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकारच उरला नाही. मराठवाड्याची कवचकुंडलं सरकारनं मारून टाकली, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भाजपचे फडणवीस, दानवेंच्या जलाक्रोशानं जालना दणाणलं, राष्ट्रवादी नेते पालकमंत्री राजेश टोपेंचं उत्तर पहा किती शांत..VIDEO
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 5:11 PM

जालनाः औरंगाबादच्या जलाक्रोश मोर्चानंतर  (Jalakrosh Morcha)भाजपनं बाजूच्याच जालना जिल्ह्यातील पाणी प्रश्नाला आज हात घातला. हजारोंच्या संख्येनं भाजप कार्यकर्त्यांसहित सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून आज भाजपच्या नेतृत्वाखाली जालन्यात आंदोलन केलं. अडीच वर्षांपूर्वी आमचं सरकार असताना आम्ही 229 कोटी रुपयांनी पाणी वितरण योजना मंजुर केली. मात्र महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात ही योजना तसूभरही पुढे गेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvsi) यांनी केला. जालन्यात भाजपनं एवढं मोठं शक्तीप्रदर्शन केलं. मराठवाड्यावर महाविकास आघाडी सरकारने कसा अन्याय केला, यासंबंधीचे आरोपही केले. मात्र या मोर्चाला उत्तर देताना जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत शांतपणे प्रतिक्रिया दिली. जालन्यात सुरु असलेल्या योजनेची माहिती त्यांनी दिली.

राजेश टोपेंची प्रतिक्रिया काय?

इकडे जालन्यात भाजपचं शक्तीप्रदर्शन सुरु असताना पालकमंत्री राजेश टोपे यांनी या मोर्चावर अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षांनी जे आरोप केल आहेत, त्यातील वस्तुस्थिती जाणून त्यांच्या सूचना आणि सल्ल्याचं आम्ही पालन करू, असं उत्तर त्यांनी दिलं. तसंच जालन्यातील पाणी वितरण योजनेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘ पाण्याची कमतरता नसेल, अशी योजना मंजूर करून घेतली आहे. 95,96 टक्के योजना पूर्ण झाली आहे. आठ ते दहा दिवसांनी सध्या पाणी दिलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. या दृष्टीनं लाँगटर्म आणि शॉर्टटर्म नियोजन आहे. 8 मोठ्या ईएसआर.. टाक्या सात टाक्यांची टेस्टिंग पूर्ण झालं आहे. काही त्रुटी आहेत. छोट्या गळती आहेत. या तत्परतेनं दुरुस्ती करून घेतल्या जातील. काही ठिकाणी रोड क्रॉसिंगची कामं करायची आहे. त्यासाठी बीअँडसीच्या परवानगी प्राप्त झाली आहे. छोट्या भागांमध्ये , पाइपलाइन्स पूर्ण करायच्या राहिल्या आहेत. हे पूर्ण झाल्यावर सात-आठ दिवसांनी जे पाणी येते, ते अंतर तीन दिवसांवर आणण्यात येईल. याची खात्री आहे. दररोज पाणी पुरवठा होण्यासाठी 70 दशलक्ष प्रति दिवस कॅपेसिटीची मोठी पाइपलाइन आपण आली आहे. टाक्याही पूर्ण झाल्या आहेत. फक्त शुब्धीकरण केंद्र 24 एमएलडीचं आहे. ते 48 एमएलडी मिळेल. ज्या सूचना विरोधी पक्षनेत्यांनी दिल्या आहेत. सल्ला आम्ही निश्चितपणे सकारात्मक दृष्टीकोनातून कारवाई करू. राजकारण करण्याचं काम नाही, असं राजेश टोपे म्हणाले.

‘सरकारने सर्व योजनांची हत्या केली’

महाविकास आघाडी सरकारने आमच्या काळात सुरु केलेल्या सर्व योजनांची हत्या केली. आम्ही समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं आणि खोरेच दुष्काळमुक्त करायचं ठरवलं. पण आघाडी सरकारनं ही योजनाच रद्द केली. शेततळे, सिचनाच्या योजनाही सरकारनं बंद केल्या. एवढच नाही तर मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची हत्याही या सरकारनं केली. त्यामुळे राज्यपालांना मराठवाड्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकारच उरला नाही. मराठवाड्याची कवचकुंडलं सरकारनं मारून टाकली, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.