गद्दारांच्या यादीत आधी सत्तारांचं नाव घ्या, आम्हाला विजयी करण्यात त्यांची मदत, जालन्याचे आमदार संतोष दानवेंचा राऊतांना सल्ला!

जर खरच गद्दारांची यादी त्यांच्याकडे असेल तर त्यांनी आधी त्यांच्याच मंत्र्याचं म्हणजे अब्दुल सत्तारांचं नाव घ्यावं.' असा सल्ला संतोष दानवे यांनी राऊतांना दिला आहे.

गद्दारांच्या यादीत आधी सत्तारांचं नाव घ्या, आम्हाला विजयी करण्यात त्यांची मदत, जालन्याचे आमदार संतोष दानवेंचा राऊतांना सल्ला!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 11:06 AM

जालनाः संजय राऊतांना (Sanjay Raut) गद्दारांची यादी करायची असेल तर त्यांनी आधी त्यांचेच मंत्री अब्दुल सत्तारांचं नाव घ्यावं, असा सल्ला भाजपचे जालन्याचे आमदार संतोष दानवे यांनी दिला आहे. मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला विजयी करण्यासाठी खूप मदत केली. अनेक अपक्ष आमदारांना आमच्या बाजूने वळवले, त्यांच्यामुळेच हा विजय संपादन करू शकलो, असा गंभीर आरोप संतोष दानवे (Santosh Danve) यांनी केलाय. निवडणुकीच्या मतदानापूर्वी शिवसेना नेते आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी संतोष दानवेंबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं होतं. जालन्यातल्या भोकरदनचे आमदार संतोष दानवेदेखील आमच्या बाजूने मतदान करणार असल्याचं भाकित त्यांनी केलं होतं.

काय म्हणाले संतोष दानवे?

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाचा विजय झाला, यावर प्रतिक्रिया देताना संतोष दानवे म्हणाले, ‘राज्यसभेची निवडणूक हा नंबर गेम नव्हता तर टेक्निकल इलेक्शन होतं. यात विजयासाठी लागणारे सगळे पर्याय खेळले गेले. अब्दुल सत्तार ज्या पक्षात आहेत, ते कधीच त्या पक्षात नसतात. म्हणून अपक्ष मतदारांना आमच्यासोबत घेण्यासाठी सत्तारांनी जी आम्हाला मदत केली, त्यांचे आभार मी व्यक्त करतो. ते ज्या पक्षात असतात, ते कधीच तिथे नसतात, हे त्यांनी परत एकदा दाखवून दिलं. ‘

हे सुद्धा वाचा

‘सत्तार बाजारात फिरत असतात’

अब्दुल सत्तारांनी संतोष दानवेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर उपहासात्मक प्रतिक्रिया देताना संतोष दानवे म्हणाले, ‘ सत्तारांनी आम्हाला १०० टक्के मतं दिली. ते नेहमी बाजारात फिरतात. कोण कुठं गेलंय, कोण कुठं चाललंय, याची सगळी माहिती त्यांना असते. अशा बडबडीने नेहमीच पक्षाला मिळते. हीच मदत आम्हाला कामी आली. विधान परिषदेतही ते आम्हाला अशीच मदत करतील’

‘गद्दारांच्या यादीत सत्तारांचं नाव घ्या’

अपक्ष मतदार-आमदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. पराभव दिसल्यानंतर संजय राऊतांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. जर खरच गद्दारांची यादी त्यांच्याकडे असेल तर त्यांनी आधी त्यांच्याच मंत्र्याचं म्हणजे अब्दुल सत्तारांचं नाव घ्यावं.’ असा सल्ला संतोष दानवे यांनी राऊतांना दिला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.