आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच, भारती पवारांचं टीकास्त्र
नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात. राज्य सरकारने याकडे त्वरीत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या आदिवासी कल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधांच्या विकासासाठी मी वचनबद्ध आहे. केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देणार, असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहे. तसंच नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात, अशी टीकाही भारती पवार यांनी केलीय. (Dr. Bharti Pawar criticizes Mahavikas Aghadi government over health facilities in tribal areas)
निधीची कमतरता भासू देणार नाही
तळोदा येथील आदिवासी विकास भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. हीना गावित, आमदार राजेश पाडवी, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके, जनजातीय राज्यक्षेत्र संपर्कप्रमुख किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाल्या की, नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात. राज्य सरकारने याकडे त्वरीत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या आदिवासी कल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास करण्यावर अधिक भर देईन.
देवमोगरा देवीचे दर्शन
या यात्रेदरम्यान डॉ. पवार यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. माजी वनमंत्री स्वर्गीय दिलवरसिंग पाडवी यांच्या समाधीस भेट देऊन अभिवादन केले. खापर, अक्कलकुवा मार्गे गुजरात राज्यातील देवमोगरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर दोंडाईचा येथे आ.गिरीश महाजन, आ.जयकुमार रावल, आ.काशीनाथ पावरा, धुळे ग्रामीण अध्यक्ष नारायण पाटील व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले.
आशा भगिनींनी दिलेलं योगदान अभिमानास्पद
कोरोना काळात ग्रामीण व निमशहरी भागातील बालकांच्या व महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आशा भगिनींनी दिलेले योगदान अभिमानास्पद आहे, अशा शब्दात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आशा भगिंनींचे कौतुक केले. जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मालेगावात आशा वर्कर्ससाठी आयोजीत केलेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कोरोनाचे संकट रोखण्यासाठी प्रत्येक गावागावात जनजागृती करणे, वेळोवेळी तपासणी करणे अत्यावश्यक होते. गाव पातळीवर ही जबाबदारी आशा भगिंनींनी मोठ्या जोखमीने सांभाळली. त्यांचे हे योगदान कौतुकास्पद आहे. यावेळी डॉ. पवार यांनी आशा भगिंनींनीशी संवाद साधत प्रत्यक्ष काम करत असताना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर त्यांना मार्गदर्शनही केलं.
#जन_आशीर्वाद_यात्रा_नंदुरबार_जिल्हा#JanAshirvadYatra क्रांतिस्मारक येथे अभिवादन तसेच सेवानिवृत्त जवानांचा सत्कार केला. pic.twitter.com/HO35RjqQpv
— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) August 20, 2021
इतर बातम्या :
पिंपरी-चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार, चंद्रकांत पाटलांचा दावा
Dr. Bharti Pawar criticizes Mahavikas Aghadi government over health facilities in tribal areas