Jaya Bachchan : 11 लाखांसाठी त्रास का दिला जातोय? संजय राऊतांच्या अटकेवर जया बच्चन भडकल्या; म्हणाल्या, 2024पर्यंत हे सर्व चालेल

Jaya Bachchan : जया बच्चन यांचा ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांना संजय राऊत यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ईडीचा दुरुपयोग केला जातोय, असं तुम्हाला वाटतं का?

Jaya Bachchan : 11 लाखांसाठी त्रास का दिला जातोय? संजय राऊतांच्या अटकेवर जया बच्चन भडकल्या; म्हणाल्या, 2024पर्यंत हे सर्व चालेल
संजय राऊतांच्या अटकेवर जया बच्चन भडकल्या; म्हणाल्या, 2024पर्यंत हे सर्व चालेलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 7:46 AM

नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केली आहे. तसेच त्यांनी तीन दिवसांची ईडी (ED) कोठडीही ठोठावण्यात आली आहे. राऊत यांच्या अटकेचे राज्यात आणि संसदेत तीव्र पडसाद उमटले आहेत. बॉलिवूडमधूनही राऊत यांच्या अटकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) या सुद्धा संजय राऊत यांच्या अटकेवर भडकल्या आहेत. केवळ 11 लाख रुपयांसाठी त्रास का दिला जात आहे? असा सवाल करतानाच 2024पर्यंतच हे सर्व सुरू राहील, असं जया बच्चन म्हणाल्या. या संपूर्ण प्रकरणाला भाजपच जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणावर दिग्दर्शक अशोक पंडित आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जया बच्चन यांचा ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांना संजय राऊत यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ईडीचा दुरुपयोग केला जातोय, असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल जया बच्चन यांना करण्यात आला आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अर्थातच. ईडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. 11 लाख रुपयांसाठी तुम्ही अशा प्रकारे कुणाला तरी त्रास देत आहात, असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांची आई खूप वयस्कर आहे, असं विचारलं असता होय, माल माहीत आहे, असं जया बच्चन म्हणाल्या. ईडीचा वापर कधीपर्यंत चालेल असं तुम्हाला वाटतं? असा सवाल केला असता, जया बच्चन यांनी अत्यंत कठोर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. 2024पर्यंत हे सर्व चालेल, असं त्या म्हणाल्या.

सुदर्शन चक्र तर सुटले आहे

जया बच्चन यांच्यानंतर शर्लिन चोप्रा हिनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने ट्विट केलं आहे. शर्लिनने या ट्विटमध्ये राऊत यांचं कोट वापरून आपलं मत व्यक्त केलं आहे. मोदींच्या पक्षात सर्व श्रीकृष्ण आहेत- राऊत, क्या भारी बोललात. सुदर्शन चक्र तर सुटले आहे, असं ट्विट शर्लिनने केलं आहे.

बच के रहना रे बाबा, बच के रहना रे

अशोक पंडित यांनी संजय राऊत आणि बरखा दत्त यांचा फोटो शेअर करत, बच के रहना रे बाबा, बच के रहना रे. बरखा दत्त यांची आणखी एक शिकार, असं म्हटलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.