राजकारणातील मंडळीना अशी भीती दाखवायला लागले तर लोकशाहीच संपुष्टात येईल, देशमुखांवरील कारवाईवरुन जयंत पाटलांचा केंद्रावर निशाणा

राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो. त्यामुळे हे राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवली जाऊ लागली तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल, असं मत जयंत पाटील व्यक्त केलंय.

राजकारणातील मंडळीना अशी भीती दाखवायला लागले तर लोकशाहीच संपुष्टात येईल, देशमुखांवरील कारवाईवरुन जयंत पाटलांचा केंद्रावर निशाणा
जयंत पाटील, जलसंपदामंत्री
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 3:31 PM

नांदेड : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या छापेमारीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो. त्यामुळे हे राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवली जाऊ लागली तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल, असं मत जयंत पाटील व्यक्त केलंय. आज नांदेड येथे पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. (Jayant Patil criticizes BJP leaders over action against Anil Deshmukh)

NIA ने मनसुख हिरेन यांच्या हत्येच्यादृष्टीने मेन टार्गेट ठेवले पाहिजे. परंतु त्याऐवजी अटक झालेल्या व्यक्तीकडून काही वदवून घेऊन त्यानुसार सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा हा नवा प्रकार भाजपने देशात सुरू केलेला दिसतो, असा गंभीर आरोपही जयंत पाटील यांनी केलाय. परमबीरसिंग यांना आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी आरोप केला आहे, म्हणजे त्यापूर्वी त्यात तुम्ही सहभागी होता का? असा सवालही जयंत पाटील यांनी केलाय.

कुणीतरी ‘अ’ आणि ‘ब’ चं नाव घेत असेल आणि त्यावर कारवाई होत असेल तर ही अत्यंत चुकीची पध्दत आहे. असंच घाबरवण्याचं काम केंद्रसरकारच्या एजन्सी करत असतील तर लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम सुरू झालं आहे, अशी घणाघाती टीका जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केलीय.

देवेंद्र फडणवीसांना टोला

सत्तेत आल्यानंतर ओबीसींचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा, आम्ही प्रश्न सोडवू. त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही. जनतेनं तुम्हाला नाकारलं आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय. त्याचबरोबर सत्तेत आल्याशिवाय काहीच करायचं नाही का? असा सवालही जयंत पाटील यांनी फडणवीसांना विचारला आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते. दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीसांनी ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं, आम्ही त्यांना श्रेय देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीसांची गर्जना काय?

पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

‘ओबीसींचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा, सत्तेत येण्याची गरज नाही’, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

ओबीसींना 4 महिन्यांत आरक्षण मिळवून देईन, फडणवीसांच्या गर्जनेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

Jayant Patil criticizes BJP leaders over action against Anil Deshmukh

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.