बारामतीत सूर्य पश्चिमेला उगवेल, मात्र, बारामतीकर पवारसाहेबांना सोडणार नाहीत: जयंत पाटील

सत्ता आहे तर सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून ते अशा तयारीला लागले आहेत. याचा अर्थ भाजपला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागलीय हे लक्षात यायला लागले आहे. जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजप करते.

बारामतीत सूर्य पश्चिमेला उगवेल, मात्र, बारामतीकर पवारसाहेबांना सोडणार नाहीत: जयंत पाटील
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 5:54 PM

मुंबई: बारामतीमधील (baramati) जनता कशी आहे याची माहिती त्यांना नाही. त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियाताई सुळे आणि अजित पवार (ajit pawar) यांना मिळतेच. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल. परंतु बारामती पवारसाहेबांना सोडणार नाही. एवढं ते घट्ट नातं बारामतीकर आणि पवार कुटुंबीयांचं आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील (jayant patil) यांनी सांगितलं. एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवारसाहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. मीडियाशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी भाजप आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

बारामतीत उमेदवार कोण द्यायचा हे भाजप ठरवेल. बारामती सध्या भाजपने टार्गेट केली आहे. शिवाय आमच्याकडेही टार्गेट केले आहे. असं वातावरण तयार करायचं की आम्ही सर्वात मोठ्या लोकांना टार्गेट करतोय अशी भाजपची मीडियासमोर जाण्याची पद्धत आहेत. मात्र थोड्या दिवसात आमचाही प्लॅन मांडला जाणार आहे. त्यावेळी कुणाकुणाला टार्गेट करतोय हे तुमच्याही लक्षात येईल, असा सूचक इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

भाजपची लोकप्रियता कमी होतेय

यावेळी त्यांनी भाजपच्या लोकप्रियतेवरूनही टीका केली. सत्ता आहे तर सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून ते अशा तयारीला लागले आहेत. याचा अर्थ भाजपला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागलीय हे लक्षात यायला लागले आहे. जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजप करते, अशी टीकाही त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

ते बावनकुळेंना शोभत नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले होते. ते का नाकारले याची चर्चा करु इच्छित नाही. परंतु बावनकुळे यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर अशा पध्दतीने बोलणं त्यांना शोभत नाही, असंही ते म्हणाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.