अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना लढावेच लागेल, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन, ठाण्यात सावित्रीच्या लेकींचा सन्मान

आज ओबीसींचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण, हे आरक्षण संपवणाऱ्या केंद्राविरोधात ओबीसी आक्रमक होत नाहीत. आता लढण्याची वेळ आली आहे. पांगळे होऊ नका, लढा, अशा शब्दात आव्हाड यांनी केंद्र सरकारविरोधात लढा उभारण्याचं आवाहन केलं.

अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना लढावेच लागेल, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन, ठाण्यात सावित्रीच्या लेकींचा सन्मान
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 5:06 PM

ठाणे : ‘मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने (OBC Community) लढायला हवे होते. पण, त्यावेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण, त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे. पण, आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना मैदानात उतरावेच लागेल, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज केले.ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड बोलत होते. या प्रसंगी आ. रवींद्र फाटक, आ. निरंजन डावखरे, स्थायी समिती सभापती संजय भोईर, आदी उपस्थित होते.

यावेळी आव्हाड म्हणाले , जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले जर नसते तर आज इथे कोणतीच महिला दिसली नसती. महिला कोणत्याही जातीधर्माची असली तरी ती सुशिक्षित झाली त्याचे श्रेय फक्त आणि फक्त सावित्रीमाई यांनाच जाते. कार्ल मार्क्स याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते जोतिराव फुलेच आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा ओबीसींसाठीच दिला आहे, याची जाणीव तमाम ओबीसींनी ठेवली पाहिजेत. आज ओबीसींचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण, हे आरक्षण संपवणाऱ्या केंद्राविरोधात ओबीसी आक्रमक होत नाहीत. आता लढण्याची वेळ आली आहे. पांगळे होऊ नका, लढा, अशा शब्दात आव्हाड यांनी केंद्र सरकारविरोधात लढा उभारण्याचं आवाहन केलं.

इम्पिरिकल डेटासाठी राज्य सरकारवर दबाव आणा- डावखरे

तर आमदार निरंजन डावखरे यांनी ओबीसी एकवटू लागले आहेत, हे अत्यंत चांगले आहे. पण, राज्याने इम्पिरिकल डाटा सादर करून ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन केले. तर, ओबीसी नेतृत्व अशोक वैती यांनी, एका कार्यक्रमापुरते मर्यादित राहू नये. ठाणे ओबीसी एकीकरण समितीने यापुढेही नियमित एकत्र येणे गरजेचे आहे. जर आपण एकत्र आलो तरच ओबीसींची बिगर राजकीय ताकद उभी राहिल, असं सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिनल पालांडे , डाॅ. अर्चना पवार, प्रा. नलिनी कुडूक, आरती प्रधान, श्रृतीका महाडीक, शितल खरटमल, वर्षा मटकर, जयश्री रामाणे, प्रज्ञा गायकवाड, संगीता बामणे, विमल तांबे, कन्या खानविलकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

इतर बातम्या :

पुण्यात तूर्तास शाळा बंदचा निर्णय नाही, पालकमंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर नवी नियमावली, महापौरांकडून स्पष्ट

मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय, किती तारखेपर्यंत बंद राहणार शाळा? वाचा सविस्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.