Jitendra Awhad : ब्रेकिंग! विवियाना मॉल मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; हायकोर्टात धाव घेणार
जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेसंदर्भातील आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी!
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अखेर जामीन फेटाळला आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात जितेंद्र आव्हाड यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आव्हाड यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आव्हाड आता आजच उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं सूत्रांनी सांगितंल. न्यायाधीश डी.एस. पाल यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. विवियामा मॉलमध्ये (Viviana Mall, Thane) हर हर महादेव (Har Har Mahadev Movie) चित्रपटाचा शो बंद पाडताना प्रेक्षकाला केलेल्या मारहाणीविरुद्ध जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलंय. जितेंद्र आव्हाड यांच्यासह अकरा जणांना आज कोर्टात हजर करणार आलं. जितेंद्र आव्हाड यांच्यावर एकूण सात कलमं वर्तक नगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली लावली आहेत.
जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर तैनात करण्यात आला होता. जितेंद्र आव्हाड यांचे अनेक समर्थक हे कोर्टाबाहेर जमल्यानं पोलिसांनी मौठा फौजफाटा तैनात केला होता. दरम्यान, विवियाना मॉलमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
पाहा व्हिडीओ
जितेंद्र आव्हाड यांना आज सकाळी कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. शुक्रवारी रात्र जितेंद्र आव्हाड यांना पोलीस कोठडीतच काढावी लागली होती. वर्तक नगर पोलिसांत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शुक्रवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांना रुग्णालयातही घेऊन जाण्यात आलं होतं. हायपरटेन्शनचा त्रास जाणवू लागल्याने जितेंद्र आव्हाड यांना घेऊन पोलीस रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी आव्हाड यांच्या समर्थकांनी पोलिसांना घेरावही घातला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आव्हाडांच्या अटकेचा निषेध करण्यात आलाय. आव्हाडांना करण्यात आलेली अटक ही सरकार हुकूमशाहीपणे वागत असल्याचा पुरावा आहे, अशी टीका करण्यात आली होती. मुंब्रा आणि ठाणे परिसरात आव्हाडांच्या समर्थकांनी शुक्रवारपासूनही निदर्शनं करत आव्हांडांच्या अटकेविरुद्ध आवाज उठवला होता.