स्वातंत्र्योत्तर भारतात पहिल्यांदाच संसदेत शिंदे घराण्यातील एकही जण नसेल!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने 300 चा आकडा पार करत निर्विवाद बहुमत मिळवून सत्ता राखली. या निवडणुकीत भाजपला जसे घवघवीत यश मिळाले, तसेच अनेक ऐतिहासिक विजय-पराजय सुद्धा पाहायला मिळाले. मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघातही मोठा पराभव पाहायला मिळाला. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला. […]

स्वातंत्र्योत्तर भारतात पहिल्यांदाच संसदेत शिंदे घराण्यातील एकही जण नसेल!
Follow us
| Updated on: May 24, 2019 | 8:34 AM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने 300 चा आकडा पार करत निर्विवाद बहुमत मिळवून सत्ता राखली. या निवडणुकीत भाजपला जसे घवघवीत यश मिळाले, तसेच अनेक ऐतिहासिक विजय-पराजय सुद्धा पाहायला मिळाले. मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघातही मोठा पराभव पाहायला मिळाला. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला. या पराभवाला ऐतिहासिक अंगसुद्धा आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतात पहिल्यांदाच भारताच्या संसदेत मध्य प्रदेशातील शिंदे घराण्यातील कुणीच सदस्य खासदार म्हणून नसेल.

मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. कृष्ण पाल सिंह यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना तब्बल 1.25 लाख मतांनी पराभूत केले. काँग्रेसच्या मोठ्या पराभवांपैकी एक पराभव म्हणजे गुनातील ज्योतिरादित्य यांचा पराभव मानला जातो आहे.

शिंदे घराणे मध्य प्रदेशातील साधन-संपत्ती संपन्न आणि तितकेच राजकीय वलय, विजयी पार्श्वभूमी असलेले घराणे आहे. 1957 पासून आजवर शिंदे घराण्यातील कुणा ना कुणी सदस्य संसदेत खासदार म्हणून निवडून गेला आहे. मात्र, यंदा भाजपच्या उमेदवाराने शिंदे घराण्याच्या विजयाची ऐतिहासिक परंपरा खंडित केली.

राजमाता विजयाराजे शिंदे

1957 आणि 1967 या अशा दोनवेळा राजमाता विजयाराजे शिंदे यांनी गुनामधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली होती. तर 1962 मध्ये ग्वाल्हेरमधून विजयाराजे शिंदेंनी निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1989 ते 1999 या काळातही त्या गुनामधून खासदार होत्या.

माधवराव शिंदे

1971 मध्ये माधवराव शिंदे यांनी गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर 1984 पर्यंत ते गुनातून खासदा म्हणून निवडून आले. त्यानंतर 1984 ते 1999 पर्यंत ग्वाल्हेर, पुन्हा 1999 साली गुना अशा निवडणुका ते विजयी झाले.

ज्योतिरादित्य शिंदे

2002 ते 2019 पर्यंत ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुना मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. मात्र 2019 साली म्हणजे यंदा या ऐतिहासिक विजयाला खंड पडला. भाजपच्या उमेदवाराने ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव केला आणि पहिल्यांदाच शिंदे घराण्यातील कुणाही संसदेत खासदार म्हणून निवडून गेले नाहीत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.