‘शिवसेनेच्या खासदारांनाच वाटतं की हे सरकार कधी पडतं’, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा खळबळजनक दावा
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शिवसेनेच्या खासदारांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलंय. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या खासदारांना वाटतं ही हे सरकार कधी पडतंय. ते खासगीत देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतात, असं वक्तव्य पाटील यांनी केलंय.
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियानाचा कोकण विभागीय मेळावा आज ठाण्यात पार पडला. त्यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शिवसेनेच्या खासदारांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलंय. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या खासदारांना वाटतं ही हे सरकार कधी पडतंय. ते खासगीत देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतात, असं वक्तव्य पाटील यांनी केलंय. पाटलांच्या या दाव्यानं आता राज्यातील राजकारण रंगण्याची शक्यता आहे. (Kapil Patil’s sensational statement about Shivsena MPs in Thane)
कपिल पाटलांचं खळबळजनक वक्तव्य
‘शिवसेनेचे खासदार अनेकवेळा भेटतात. त्यांच्या खासगीतील चर्चा, कमेंट्स आहेत, त्यांनाच असं वाटतं की हे सरकार कधी पडतंय. अशा प्रकारची भावना त्यांची झाली आहे. आणि एक गोष्ट ते अतिशय जबाबदारीने उल्लेख करतात की जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे जात होतो, आम्हाला त्यांच्याकडून कुठल्याही कामाला कधीच नकार आला नाही. कधीच त्रास झाला नाही. ही काम करण्याची पद्धत या मुख्यमंत्र्यांची होती’, असं वक्तव्य कपिल पाटील यांनी भाजपच्या ओबीसी मेळाव्यात बोलताना केलंय.
ओबीसी जागर अभियान कोकण व ठाणे विभागीय मेळावा विरोधी पक्षनेते श्री. @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत..https://t.co/ghspo4glMg
— Kapil Patil (@KapilPatil_) October 20, 2021
‘हेच पाटील फडणवीस, मोदींविरोधात बोलायचे’, राऊतांचा टोला
कपिल पाटील यांच्या बेताल वक्तव्याला आम्ही फारसं महत्व देत नाही. कारण हेच कपिल पाटील खासदार होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ते बोलत होते. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणारे म्हणून त्यांची ख्याती होती. शिवसेनेचे खासदार अनेकवेळा येतात, मंत्र्यांना भेटतात, त्यांच्या मतदारसंघातील कामं करायची असतात. आम्ही पंतप्रधान मोदींनाही भेटत असतो. हे कपिल पाटील त्यावेळी काय तिथे वास काढत बसलेले असतात का? असा माझा प्रश्न आहे. क्षमता नसताना असं मंत्रिपद मिळालं की त्यांचे हात स्वर्गाला टेकल्यासारखे होतात, त्यातील एक कपील पाटील आहेत. पब्लिसिटी त्यांनी हे वक्तव्य केलंय. शिवसेनेविरोधात बोललं की मिडीया कव्हरेज मिळतं, हे त्यांना माहिती आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कपिल पाटलांना लगावलाय.
ओबीसी आरक्षण : फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा
ओबीसी मेळाव्यात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. ओबीसी आरक्षण केवळ गेलं नाही तर ओबीसी समाजावर आज मोठा अन्याय होतोय. त्याचसाही हे ओबीसी जागर अभियान आहे. महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळं ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं. यांची इकोसिस्टीम एका सुरात खोटे बोलते. ओबीसी आरक्षण संपूर्ण देशात देले नाही तर केवळ आणि केवळ महाराष्ट्रात गेलं आहे. इम्पिरिकल डेटा आणि जनगणनेचा डेटा यात सुद्धा कायम बुद्धिभेद केला जातो. केंद्राकडे आहे तो जनगणनेचा डेटा आणि त्याचा आरक्षणाशी संबंध नाही. आरक्षण देण्यासाठी इम्पिरिकल डेटा हवा आहे आणि तो राज्य सरकारचं मागासवर्ग आयोगाकडून मिळवू शकते. बारा बुलतेदारांना या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. ते बोलघेवड्यांचे सरकार आहे. ओबीसींना न्याय मिळत नाही, तोवर भाजप गप्प बसणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलाय.
इतर बातम्या :
Priyanka Gandhi : प्रियंका गांधी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात, राजकारण तापायला सुरुवात
गाव जेवण एक दिवस देणार की पुढील तीन वर्षे? चंद्रकांतदादांच्या ऑफरवर अशोक चव्हाणांचा सवाल
Kapil Patil’s sensational statement about Shivsena MPs in Thane