महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके जिंकणार का?, काय आहे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचं गणित?; वाचा सविस्तर

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यामुळे बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. (Karnataka bypolls: what will happen in belgaum by-election?)

महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके जिंकणार का?, काय आहे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचं गणित?; वाचा सविस्तर
shubham shelke
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 12:38 PM

बेळगाव: केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यामुळे बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीने अवघ्या 26 वर्षीय शुभम शेळके यांना मैदानात उतरवले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने शेळके यांच्यामागे सर्व ताकद लावली आहे. भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती अशी तिरंगी लढत बेळगावात होत आहे. मात्र, ही पोटनिवडणूक मराठी विरुद्ध कानडी अशीच लढली जात आहे. उद्या या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (Karnataka bypolls: what will happen in belgaum by-election?)

कोण आहेत शुभम शेळके?

शुभम शेळके यांचं वय अवघे 26 वर्ष आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शुभम विक्रांत शेळके यांचा फॉर्म भरला होता. समिती कार्यकर्त्यांनींच त्यांचं डिपॉझिट भरले. सर्वसामान्य कुटुंबातील असणारे शुभम शेळके यांचा लहानपणापासूनच सीमाप्रश्न जवळचा संबंध होता. शुभम शेळके यांचं शिक्षण sslc झालं आहे. लहानपणापासून त्यांनी आंदोलन जवळून पाहिले आहे. सीमाप्रश्नाची झालेल्या वाताहतीमुळे त्यांनी युवा समितीच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. मागील पाच वर्षात शैक्षणिक उपक्रम, मराठी शाळांना मदत यासोबत सीमा आंदोलनात भाग घेतला. युवा समितीने सीमा भागातील युवकांना एकत्रित करून, या चळवळींमध्ये युवकांना प्राधान्य दिले. त्यामुळेच आज शुभम शेळके यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.

कोण होते सुरेश अंगडी?

सुरेश अंगडी यांनी सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2004 मध्ये ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते, त्याचवेळी पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. तत्कालीन खासदार अमरसिंग पाटील यांचा पराभव करून अंगडी लोकसभेवर निवडून गेले. सुरेश अंगडी यांच्या विजयात मराठी मतांचा वाटा सर्वाधिक होता. 2004 पाठोपाठ 2009 आणि 2014 मध्येही त्यांना मराठीबहुल भागात सर्वाधिक मते मिळाली. 2019 मध्ये मराठीबहुल भागात त्यांचे मताधिक्‍य कमी होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात असताना उलट त्यांचे मताधिक्‍य वाढले होते.

शिवसेनेची माघार

भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे. काँग्रेसचे सतिश जारकिहोळी हे मुळचे गोकाक भागातील असल्याने त्यांना गोकाक आणि अरभावीतील मतदारांसह कन्नड भाषिक तसेच दलित आणि मुस्लिम समाजाचा पाठींबा आहे. एकूण 10 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

मतदारसंघ काय सांगतो?

बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, अरभावी, गोकाक, बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती-यल्लमा आदी एकूण 8 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी बैलहोंगल आणि बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर उर्वरित 6 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत मराठी भाषिक नेमकं काय करणार? याकडे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचंही लक्ष लागलं आहे.

अंगडी यांचं पारडं जड?

2019मध्ये लोकसभा निवडणुकीत सुरेश अंगडी यांनी काँग्रेसच्या डॉ. व्ही. एस. साधूण्णवर यांचा 3 लाख 91 हजार 304 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत अंगडी यांना 7 लाख 61 हजार 991 मते मिळाली होती. तर साधूण्णवर यांनी 3 लाख 70 हजार 687 मते मिळाली होती. बेळगावमध्ये एकूण 18 लाख 13 हजार 538 मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदार 91,10,25, महिला मतदार 90,24, 55 आणि इतर 58 मतदार आहेत. गेल्यावेळी अंगडी यांना मराठी बहुल इलाक्यातही मोठी मते मिळाली होती. तर, अंगडी आणि काँग्रेसमध्येच चुरशीची लढत झाली होती. त्यामुळे यावेळीही काँग्रेस आणि भाजपमध्येच खरी लढत असल्याचं चित्रं आहे. बेळगावात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मतदार नगण्य आहेत. त्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव पडणार नाही. बेळगावातील मराठी मते एकत्र आली तरी भाजपला टक्कर देणं कठीण जाणार असून उलट एकीकरण समिती आणि काँग्रेसच्या स्वतंत्र लढण्याचा भाजपला फायदा होणार असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

लिंगायत किंगमेकर

बेळगाव लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक लोकसंख्या लिंगायत मतदारांची आहे. एकूण 18 लाख 13 हजार 538 मतदारांपैकी लिंगायत मतदार 6.25 लाख आहेत. यापैकी 3.25 लाख मराठी मतदार आहेत. 1.80 लाख कुरबर, 65 हजार विणकर, 40 हजार जैन, 40 हजार ब्राह्मण, 2 लाख मुस्लिम आणि 2 लाख मागासवर्गीय मतदार आहेत. भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे आहेत. त्यामुळे ही मते भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Karnataka bypolls: what will happen in belgaum by-election?)

जातीय समीकरण काय सांगते?

मंगला अंगडी या लिंगायत समाजातील आहेत. त्यांचे पत्नी सुरेश अंगडी यांना लिंगायत आणि मराठी मते मोठ्या प्रमाणावर मिळत होते. त्यामुळे मंगला यांची सर्व भिस्त या दोन्ही मतदारांवर आहे. तर काँग्रेसचे जारकीहोळी हे वाल्मिकी नायक समाजातील आहे. या समाजाची मते खूप कमी आहेत. मात्र, काँग्रेसचं वर्चस्व अधिक असल्याने त्यांची सर्व भिस्त पारंपारिक मतांवर आहे. शुभम शेळके मराठी असून त्यांना मराठी, मुस्लिम आणि दलित-मागासवर्गीयांची मते मिळतील अशी आशा वाटत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (Karnataka bypolls: what will happen in belgaum by-election?)

संबंधित बातम्या:

कोण आहे शुभम शेळके, ज्याला जिंकवण्यासाठी संजय राऊत, तर हरवण्यासाठी फडणवीस जीवाचं रान करतायत?

आधी संजय राऊतांना मैदानात उतरवलं, आता स्वत: सायकलवर प्रचार, धैर्यशील मानेंनी बेळगाव पिंजलं!

Belgaum Bypoll: ‘देवेंद्र फडणवीस बेळगावात प्रचाराला आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल’

बेळगावची मराठी जनता कुणाचं ऐकणार? राऊतांचं की फडणवीसांचं? राऊतानंतर आता फडणवीस दौऱ्यावर

(Karnataka bypolls: what will happen in belgaum by-election?)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.