ठाकरेंचा उमेदवार, मात्र हातावर ‘देवेन्द्र’चा टॅटू, आता फडणवीस म्हणतात, हृदयात फक्त प्राची वहिनींना ठेवा!

नरेंद्र पाटील यांनी गेल्या महिन्यात आपल्या हातावर ‘देवेन्द्र’ हे नाव कोरले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावरुनच नरेंद्र पाटलांनी हा टॅटू बनवून घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या होत्या.

ठाकरेंचा उमेदवार, मात्र हातावर 'देवेन्द्र'चा टॅटू, आता फडणवीस म्हणतात, हृदयात फक्त प्राची वहिनींना ठेवा!
नरेंद्र पाटील यांच्या हातावर देवेन्द्र असा टॅटू
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 4:25 PM

नवी मुंबई : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आपल्या हातावर देवेंद्र नावाचा टॅटू काढल्यानंतर, आता जवळपास महिनाभराने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “तुमच्या हृदयात प्राची वहिनींना ठेवा, अजून कुणाला ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही, आम्हाला तुम्ही डोक्यात ठेवा, प्रार्थनेत ठेवा, आशिर्वादात ठेवा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नवी मुंबईत बोलत होते.

नरेंद्र पाटील यांनी गेल्या महिन्यात आपल्या हातावर ‘देवेन्द्र’ हे नाव कोरले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावरुनच नरेंद्र पाटलांनी हा टॅटू बनवून घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या होत्या.

महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपला पुन्हा जवळ केलं आहे.

Narendra Patil Devendra Fadnavis Tattoo

Narendra Patil Devendra Fadnavis Tattoo

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचं अध्यक्ष बनवणं हा माझा स्वार्थ होता. अण्णासाहेब पाटील महामंडळला पैसे दिले होते आणि नरेंद्र पाटील यांनीच ते काम करावं आणि मराठा समाजला उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी माझी धारणा होती. त्यामुळेच त्यांना अध्यक्ष केलं. नरेंद्रजी तुमच्या हृदयात प्राची वहिनींना ठेवा, अजून कुणाला ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला तुम्ही डोक्यात ठेवा, प्रार्थनेत ठेवा, आशिर्वादात ठेवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माथाडी कामगारांचं लसीकरण

अतिशय कठीण परिस्थिती काम करणारा माथाडी कामगार आहे. त्यांचं लसीकरण प्राधान्याने झाले पाहिजे. नरेंद्र पाटील यांनी अतिशय चांगला प्रयत्न केला आहे. 10 हजार लसी एनजीओच्या माध्यमातून मी स्वतः उपलब्ध करून देईन. जेणे करून माथाडी कामगार स्वस्थ राहिला पाहिजे. माझं कार्यक्षेत्र विदर्भ होतं म्हणून माथाडी चळवळ किती महत्वाचा आहे हे मला नरेंद्र पाटील यांनी पटवून दिले, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

राज्य सरकारचा कांगावा का?

केंद्र सरकारने कुठेच सांगितलेल नाही की मंदिर बंद ठेवावेत, परंतु राज्य सरकार हा कांगावा का करत आहे हे मला समजून येत नाही. सगळ्या राज्यात मंदिरं उघडी आहेत, परंतु महाराष्ट्रातच फक्त मंदिरं बंद आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते नवी मुंबईत बोलत होते. भाजपने केलेल्या मंदिरासाठीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवावर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्यावरुन मनसे आणि भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शिवाय भाजपने घंटानाद आंदोलन करुन राज्य सरकारचा निषेध केला होता.

त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केंद्र सरकारने कुठेच सांगितलेल नाही की मंदिर बंद ठेवावेत, परंतु राज्य सरकार हा कांगावा करत आहे, देशात सर्व राज्यात मंदिरं उघडली, मात्र केवळ आणि केवळ महाराष्ट्रातच मंदिरं बंद आहेत”

तर परमनंट लॉकडाऊन

कोव्हिडशी आपण सारे झुंझतो आहे, अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज दिले. भारतासारख्या महाकाय देशात लसीकरण मोहिम कठीण होती, पण ती सुरू केली.

आज चार लसी भरतात तयार केल्या नसत्या तर लसीकरण शक्य झालं नसतं. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशाने सांगितलं असतं की आधी आम्ही लसीकरण करू नंतर तुम्हाला देऊ. त्यामुळे आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो. लोकांच्या मनातला संभ्रम दूर करणेही गरजेचा आहे. कुणी सांगितलं मृत्यू होतो, नपुंसकत्व येते असे संभ्रम पसरवले. या लसीचा प्रभाव आता लोकांच्या लक्षात आला आहे.

कोण आहेत नरेंद्र पाटील?

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील विधिमंडळाचे माजी आमदार नरेंद्र पाटलांनी शिवसेनेकडून सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. सातारा मतदारसंघातून पराभवानंतर दीड वर्षांनी शिवसेनेला रामराम

संबंधित बातम्या  

ठाकरेंच्या उमेदवाराच्या मनगटावर फडणवीसांचे नाव, ‘नरेंद्र’ यांच्या हातावर ‘देवेन्द्र’ टॅटू

12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा आज सुटण्याची आशा, मुख्यमंत्री-राज्यपालांच्या भेटीची वेळ ठरली!

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.