ठाकरे-पवारांनी लक्ष घालून निवडून आणलं, खेडमधील सभापतींचा सहा महिन्यातच राजीनामा

खेड पंचायत समितीमध्ये (Khed Panchayat Samiti) राष्ट्रवादीला (NCP) मोठा दणका बसला आहे. खेड पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी (Arun Chaudhary Resigne) यांनी अवघ्या सहा महिन्यातच सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. अरुण चौधरी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

ठाकरे-पवारांनी लक्ष घालून निवडून आणलं, खेडमधील सभापतींचा सहा महिन्यातच राजीनामा
अरुण चौधरी यांचा राजीनामा
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 7:36 AM

सुनिल थिगळे| पुणे : खेड पंचायत समितीमध्ये (Khed Panchayat Samiti) राष्ट्रवादीला (NCP) मोठा दणका बसला आहे. खेड पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी (Arun Chaudhary Resigne) यांनी अवघ्या सहा महिन्यातच सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. अरुण चौधरी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. खेड पंचायत समिती सभापती पदावरून स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सहा महिन्यांपूर्वी राजकीय नाट्य रंगल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाली होती. सभापती कोण होणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर राष्ट्रवादीचे अरुण चौधरी यांच्या गाळ्यात सभापतीपदाची माळ पडली. त्यांची पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती. मात्र त्यांनी अवघ्या सहा महिन्यातच सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने आता नवा सभापती कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बिनविरोध निवड

खेड पंचायत समितीचा सभापती कोण होणार यावरून सहा महिन्यांपूर्वी स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या मध्यस्थिने हा वाद मिटल्यानंतर राष्ट्रवादीचे अरुण चौधरी  यांची खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती.  राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अशा महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. त्यानंतर अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पुढचा सभापती कोण?

दरम्यान अवघ्या सहा महिन्यातच अरुण चौधरी यांनी राजीनामा दिल्याने खेड तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. अरुण चौधरी यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढील सभापती कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अरुण चौधरी यांनी अचानक राजीनामा का दिला याबाबतची महिती मात्र अद्याप समोर येऊ शकलेली नाहीये.

संबंधित बातम्या

गाडी फुल व्हायच्या आधी या, नंतर लटकत यावे लागेल, पक्षप्रवेशावरुन प्रवीण दरेकरांची मिश्किल टिपणी

मिसळीवर ताव मारल्यानंतर रोहित पवारांच्या पुरणपोळ्यांवरुन फडणवीसांना, तर बिलावरुन भाजप नेत्यांना जोरदार टोला!

गुलाबराव तुमच्या नावाचं पहिलं अक्षरच खराब, बाळ, वारसं दुसऱ्याचं आणि डफडं तुमचं-खडसे

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.