‘किरीट सोमय्यांना ठार मारण्याचाच हेतू होता’, चंद्रकांतदादांचा गंभीर आरोप; भाजप नेत्यांचा ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर घणाघात
पुणे महापालिका परिसरात शिवसैनिकांकडून सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या गोंधळात किरीट सोमय्या हे पायऱ्यांवर पडल्याचंही पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता असा गंभीर आरोप केला आहे. महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? असा सवालही पाटील यांनी यावेळी विचारलाय.
पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. सोमय्या आज पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाणार होते. मात्र त्यापूर्वीच पुणे महापालिका परिसरात शिवसैनिकांकडून सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या गोंधळात किरीट सोमय्या हे पायऱ्यांवर पडल्याचंही पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता असा गंभीर आरोप केला आहे. महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? असा सवालही पाटील यांनी यावेळी विचारलाय.
भाजपा नेते @KiritSomaiya यांच्यावर आज पुण्यात शिवसेनेकडून प्राणघातक हल्ला झाला. परमेश्वर कृपेने या हल्ल्यातून किरीटजी बचावले. त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
किरीटजी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है। pic.twitter.com/or3PxREwJg
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 5, 2022
महापालिकेच्या आवारात आयुक्तांना भेटायला आलेल्या सोमय्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. एकजण दगड घेऊन धावत होता. सोमय्यांना मारण्याची पूर्ण योजना झाली होती. सत्य लपणार नाही. सोमय्या यांच्या हाताला दुखापत झालीय. त्यांच्या कंबरेला मार लागला आहे. आज त्यांना ठार मारण्याचाच हेतू होता. महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? केंद्र सरकारची सुरक्षा नसती तर आज सोमय्यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती, असा हल्लाबोल पाटील यांनी केलाय.
भाजपा नेते माजी खासदार @KiritSomaiya यांच्यावर पुण्यात शिवसेनेने केलेल्या हल्ल्याचा जाहिर निषेध@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/gRyzqSndPR
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 5, 2022
सत्य हल्ले करुन लपणार नाही- आशिष शेलार
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर आता भाजप नेतेही आक्रमक बनले आहेत. ‘भ्रष्टाचाराची घबाडं ज्यांची उघड झाली त्यांना आता तोंड लपवण्यासाठी जागा न उरल्यामुळे हल्ले करु लागले आहेत. पण सत्य हल्ले करुन, दमदाटी, मारामारी करुन लपणार नाही. सत्य समोर येणारच! किरीट सोमय्या यांच्यासोबत आम्ही सगळे आहोत’, असं ट्वीट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलंय.
भ्रष्टाचाराची घबाडं ज्यांची उघड झाली त्यांना आता तोंड लपवण्यासाठी जागा न उरल्यामुळे हल्ले करु लागले आहेत. पण सत्य हल्ले करुन, दमदाटी, मारामारी करुन लपणार नाही… सत्य समोर येणारच! किरीट सोमय्या यांच्या सोबत आम्ही सगळे आहोत! https://t.co/9ivE2vrFX9
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 5, 2022
आरोपांना उत्तर द्या, प्रसाद लाड यांचं आव्हान
भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही ठाकरे सरकारवर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. ‘कर नाही, त्याला डर कशाचा! किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे सरकार असल्याचा दुरुपयोग असून, सत्ताधारी कार्यकर्त्यांनी असे हल्ले करणं निषेधार्थ आहे. किरीटजींनी केलेल्या आरोपांचे उत्तर द्या, अशा भ्याड हल्ल्यांना ते घाबरणार नाहीत!’, असा इशाराच प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिलाय.
कर नाही, त्याला डर कशाचा!
मा. @KiritSomaiya यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे सरकार असल्याचा दुरुपयोग असून, सत्ताधारी कार्यकर्त्यांनी असे हल्ले करणं निषेधार्थ आहे. मा. किरीज जींनी केलेल्या आरोपांचे उत्तर द्या, अशा भ्याड हल्ल्यांना ते घाबरणार नाहीत! pic.twitter.com/peJMlJnnWE
— Prasad Lad (@PrasadLadInd) February 5, 2022
अमृता फडणवीसांचाही हल्लाबोल
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शिवसेनेवर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केलीय. ‘कभी वाइन ने मारा, कभी ट्रैफ़िक congestion ने मारा, कभी वसूली ने मारा, कभी तेरे goon ने मारा, ऐ चौपट राजा कैसी तेरी ख़ुदगर्ज़ी, अपने ऐब छुपाने के लिए, सच्चाई को तूने चुन चुनके मारा!’, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय. तसंच किरीट सोमय्या यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
कभी वाइन ने मारा, कभी ट्रैफ़िक congestion ने मारा, कभी वसूली ने मारा, कभी तेरे goon ने मारा,
ऐ चौपट राजा कैसी तेरी ख़ुदगर्ज़ी, अपने ऐब छुपाने के लिए, सच्चाई को तूने चुन चुनके मारा !
Take care @KiritSomaiya ji ! https://t.co/kkJ58Am8rh
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 5, 2022
‘मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरून शिवसैनिकांनी हल्ला केलाय का?’
तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आरोप केलाय. ‘जनतेसमोर शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पाडणा-या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केलाय. इथं लोकशाही नव्हे ठोकशाही सुरू आहे. मुख्यमंत्री तर शेतीतलं बुजगावणं बनून राहीलेत. माझी मागणी आहे, मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरून शिवसैनिकांनी हल्ला केलाय का याचा तपास व्हायला पाहीजे’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलीय.
जनतेसमोर शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पाडणा-या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केलाय
इथं लोकशाही नव्हे ठोकशाही सुरूहे..
मुख्यमंत्री तर शेतीतलं बुजगावणं बनून राहीलेत
माझी मागणी आहे,मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरून शिवसैनिकांनी हल्ला केलाय का याचा तपास व्हायला पाहीजे… https://t.co/IfE3fPVgnO
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 5, 2022
इतर बातम्या :