पंतप्रधान मोदी – पवार भेटीवरुन सोमय्यांचा शरद पवारांवर निशाणा, संजय राऊतांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर

मोदी आणि पवार भेटीवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पवारांवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी INS विक्रांतच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलंय.

पंतप्रधान मोदी - पवार भेटीवरुन सोमय्यांचा शरद पवारांवर निशाणा, संजय राऊतांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर
शरद पवार, किरीट सोमय्या, संजय राऊतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 10:12 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मोठे तर्कवितर्क लढवण्यात येत होते. मात्र, लक्षद्वीपच्या मुद्द्यावरुन आपण मोदींना भेटल्याचं पवारांनी सांगितलं. तसंच विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती आणि संजय राऊतांवरील कारवाईचा मुद्दाही पंतप्रधान मोदींसमोर आपण उपस्थित केल्याचं पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, मोदी आणि पवार भेटीवरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पवारांवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी INS विक्रांतच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलंय.

संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींना पत्र दिलं होतं. आतापर्यंत 17 आरोप त्यांनी माझ्यावर केले आहे. त्यासंदर्भात पवारांनी चर्चा केली असेल. तसंच ठाकरे सरकारनं एसआयटी नेमली आहे. मात्र, कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, अशी माहितीही पवारांनी मोदींकडे दिली असेल, असा टोला सोमय्या यांनी लगावलाय. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील नेते लुटतात, घोटाळे करतात आणि त्यांचे घोटाळे बाहेर आले की आरोप करतात. संजय राऊत 1 हजार 40 कोटीच्या घोटाळ्यात पूर्णपणे सापडले आहेत. पत्राचाळ प्रकरणात गरिबांना एकही घर मिळाले नाही. मात्र, त्याचा एफएसआय कोट्यवधी रुपयांना प्रवीण राऊत आणि राकेश वाधवान यांनी विकला. आता संजय राऊत यांचाही तपास होणार.

ईडीच्या अधिकाऱ्यांची नावं का देत नाहीत?

संजय राऊत यांनी INS विक्रांतबाबत केलेल्या आरोपांनाही सोमय्या यांनी उत्तर दिलंय. संजय राऊतांकडे कोणतेही पुरावे नाहीत. आता ते INS विक्रांतबाबत बोलत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत. स्टंटबाजी संसदेत चालत नाही. ईडीवर आरोप केले जातात. मग ईडीच्या अधिकाऱ्यांची नावं का देत नाहीत? असा सवालही सोमय्या यांनी राऊतांना केलाय.

‘किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही’

किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारतात, शिव्या देतात. पण काय फरक पडणार आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना घोटाळ्याची उत्तरं द्यावीच लागणार. श्रीधर पाटणकर, संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केलीय. आता आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई होणार. एसआयटीच्या कितीही धमक्या दिल्या तरी किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही, असा सूचक इशाराही सोमय्या यांनी शिवसेनेला दिलाय.

‘तुमचे घोटाळे बाहेर काढणारच’

यशवंत जाधव यांच्यावर कारवाईबाबत भारत सरकारनेही तक्रार केलीय. ज्यांनी चोरी, लबाडी केली त्यांच्यावर कारवाई होणारच. विक्रांतच्या नावाने आरोप करा, किरीट सोमय्याला देशद्रोही म्हणा, जे काही बोलायचे ते बोला पण तुमचे घोटाळे बाहेर काढणारच, अशा शब्दात सोमय्या यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिलंय.

इतर बातम्या : 

अनिल देशमुखांची 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडीत रवानगी, चौकशी दिल्ली की मुंबईतच होणार?

‘INS विक्रांत’ हा सर्वात मोठा घोटाळा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संजय राऊत आक्रमक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.