‘शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, घोटाळेबाजांवर कारवाई होणारच’, किरीट सोमय्यांचा इशारा
शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर बसवायचं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचं कौतुक करताना त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं स्पष्ट केलंय. तर शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर बसवायचं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. (Kirit Somaiya criticizes Sharad Pawar and Uddhav Thackeray)
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. धमकी कोणाला ? सुप्रीम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपाला की किरीट सोमैयांना ? फक्त अनिल देशमुख नाही, जितेंद्र आव्हाडांची पण अटक झाली, आनंद अडसूळ यांची पण अटक झाली. महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच. घोटाळेबाजांवर कारवाई होणारच!, असं ट्विट करुन किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला एकप्रकारे इशाराच दिलाय.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही.
धमकी कोणाला !?
सुप्रिम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपाला की किरीट सोमैयांना !!?
फक्त अनिल देशमुख नाही, जितेंद्र आव्हाडांची पण अटक झाली, आनंद अडसूळ यांची पण अटक झाली
महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच pic.twitter.com/DDvbt8PTjb
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 18, 2021
शरद पवारांकडून अनिल देशमुखांचं कौतुक
गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा असं झालं आहे की मी नागपुरात आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख नाहीत. अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करुन राज्यातील सत्ता अस्थिर करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. या सरकारमध्ये राष्ट्रवादी महत्वाचा भाग आहे. काही लोकांना सत्ता हातातून गेल्याने अस्वस्थता आलीय. अस्थिरता निर्माण करायला अखंड प्रयत्न केलाय. वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून छळवाद सुरु केल्याचा आरोप पवारांनी केलाय. मुंबईचे पोलीस आयुक्त माझ्याकडे आले आणि त्यांनी अनिल बाबूंबद्दल ही तक्रार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अनिल देशमुख याचा दोष काय? हे मला समजत नाही. शहानिशा होईपर्यंत मी सत्तेत राहत नाही, असं मला देशमुख यांनी सांगितलं आणि स्वाभिमानाने त्यांनी राजीनामा दिला, असंही पवारांनी सांगितलं.
तपास यंत्रणांच्या धाडीवरुन पवारांचा भाजपवर निशाणा
तसंच राज्य सरकारनं जाहीर केलंय की परमबीर सिंग भगोडा आहे. परमबीर यांनी केलेले आरोप खोटे आहेत. खोटे आरोप करणारा अधिकारी बाहेर आहे आणि अनिल देशमुख आत आहेत. सत्ता गेली म्हणून काही लोक अस्वस्थ आहेत. ते केंद्राकडे लिस्ट पाठवतात आणि त्याची चौकशी करायला सांगतात. संजय राऊत यांच्या पत्नीली ईडीची नोटीस बजावली. अजित पवार यांच्याबद्दल काही करता येत नाही. म्हणून राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांच्या बहिणीच्या घरात धाडसत्र सुरु केलं. अजित पवार यांच्या घरी आयटीचे लोक पाच दिवस बसले. ते दिल्लीचे आदेश होते. हसन मुश्रीफ यांच्याबद्दल चौकशी करतात. महाराष्ट्र राज्य हातचं गेलं, ते परत मिळत नाही. म्हणून ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जातो. तुम्ही कितीही त्रास द्या. सामान्य जनता तुम्हाला कहीही सत्तेत येऊ देणार नाही. जनता आज ना उद्या वसूल करेल, असा घणाघातही पवारांनी केलाय.
इतर बातम्या :
मुस्लिम आरक्षणासाठी समाजानं रस्त्यावर उतरावं का? औरंगाबादमध्ये ओवेसींचे सरकारला 5 सवाल
Kirit Somaiya criticizes Sharad Pawar and Uddhav Thackeray