सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! एखाद्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे पाहता येतात का? तज्ज्ञ काय सांगतात?

किरीट सोमय्यांच्या कृतीवर काँग्रेसनं आक्षेप घेत, चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सोमय्या यांना फाईल दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! एखाद्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे पाहता येतात का? तज्ज्ञ काय सांगतात?
उद्धव ठाकरे, किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 6:32 PM

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या एका फोटोनं राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सोमय्या यांनी मुंबईत मंत्रालयात जाऊन नगरविकास खात्यातील काही फाईली तपासल्या. त्याचाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. सोमय्यांच्या या कृतीवर काँग्रेसनं आक्षेप घेत, चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सोमय्या यांना फाईल दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

किरीट सोमय्या यांचा नगरविकास खात्यात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईली तपासतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. सोमय्यांच्या या कृतीबाबत काँग्रेसनं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर आता सोमय्या यांनी फाईल दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नगरविकास खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतल्याचं बोललं जात आहे. मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या दालनात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल पाहतानाचा सोमय्यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले होतो. तर सोमय्या यांनी झालेला प्रकार नियमबाह्य नसल्याचा दावा केला होता.

आघाडी सरकारला कशाची भीती वाटतेय?

दरम्यान, सोमय्या यांनी आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय? मी कोणत्या कोणत्या फायली तपासल्या याची भीती वाटतेय का? असा सवाल केला. माझ्यावर आधीच आघाडी सरकारमधील नेत्यांनी 13 गुन्हे दाखल केले आहेत. आता आणखी एक गुन्हा दाखल करतील, असं विधानही किरीट सोमय्या यांनी केलं आहे. दिल्लीत टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना सोमय्या यांनी हे विधान केलं. मात्र, सोमय्या यांनी नेमक्या कोणत्या फायली चेक केल्या यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आघाडी सरकारला भीती कसली आहे? कोणत्या कोणत्या फायली तपासल्या त्याची का? वायकरांची फाईल होती की सरनाईकांची फाईल होती? किंवा अशोक चव्हाणांची होती? मला वाटतं बहुतेक भीती ती आहे. आम्हाला जगभरातून माहिती मिळत असते. वेगवेगळ्या स्तरातून माहिती मिळते. घोटाळेबाजांची माहिती मिळते. उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाणांपर्यंतची माहिती मिळत असते. मी कुठेही जाणार, जातो. माहिती गोळा करतो आणि घोटाळेबाजांना पाठवतो, असं किरीट सोमय्या म्हणाले.

कायदेतज्ज्ञ काय सांगतात?

दरम्यान, माहितीचा अधिकार कायद्यातील सेक्शन 4 आधारे कोणत्याही नागरिकाला एखाद्या कार्यालयात किंवा विभागात जाऊन कागदपत्रे तपासण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याआधी त्या संबंधित अधिकाऱ्याला तोंडी किंवा लेखी विनंती करावी लागते. राज्यात आता कायद्यानुसार कागदपत्रे पाहता येऊ शकतात. मात्र, जर संबंधित खात्यातील अधिकाऱ्याला विनंती केली नसेल तर कारवाई होऊ शकते, अशी माहिती कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी माहिती दिलीय.

इतर बातम्या :

मुंबई महापालिकेत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करु, भाजपचा संकल्प; फडणवीसांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक

Republic Day special: प्रजासत्ताकदिनी तुम्हाला ट्रेंडी दिसायचंय? या बॉलिवूड अभिनेत्रींची स्टाईल कॉपी करा आणि दिसा क्लासी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.