AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले, परदेशात मालमत्ता घेतल्या; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

राज्य सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले असून त्या पैशातून विदेशात मालमत्ता खरेदी केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. (kirit somaiya slams maharashtra government over ED enquiry)

सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले, परदेशात मालमत्ता घेतल्या; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
| Updated on: Nov 26, 2020 | 12:43 PM
Share

मुंबई: राज्य सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले असून त्या पैशातून विदेशात मालमत्ता खरेदी केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. (kirit somaiya slams maharashtra government over ED enquiry)

किरीट सोमय्या यांनी ट्विट करून हा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले आहेत. त्या पैशातून लंडन आणि विदेशात मालमत्ता खरेदी केल्या आहेत. तसेच इतर कंपन्यांमध्येही हा पैसा डायव्हर्ट करण्यात आला आहे. त्याचा तपास ईडी करत आहे. या पैशाचे लाभार्थी कोण? याचा शोध ईडी घेत आहे. त्या संदर्भातच ईडीकडून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर ठाकरे सरकार एवढी अढीबाजी का करत आहे?, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ईडीसमोर हजर राहा, असा आदेश प्रताप सरनाईक यांना देण्यात आला आहे. मुंबईबाहेरुन आल्यामुळे सरनाईकांनी विलगीकरणात असल्याचं कारण सांगत ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली होती. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक कुटुंब ईडीच्या रडारवर आहे.

ईडीने मंगळवारी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली. काल (बुधवारी) प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वारंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. (kirit somaiya slams maharashtra government over ED enquiry)

काय आहे प्रकरण?

ईडीने मंगळवारी सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी प्रताप सरनाईक भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते मुंबईत परतले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. (kirit somaiya slams maharashtra government over ED enquiry)

संबंधित बातम्या:

प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळेंना अटक, ईडीकडून सलग 12 तास चौकशी

क्वॉरंटाईन आहे, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती

क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा, प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स

(kirit somaiya slams maharashtra government over ED enquiry)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.